Every vegetable has a different harvesting period, so it should be harvested at its right maturity.
Every vegetable has a different harvesting period, so it should be harvested at its right maturity. 
कृषी सल्ला

जाणून घ्या भाजीपाला पिकांच्या काढणीच्या अवस्था

बी. जी. म्हस्के, डॉ. एन. एम. मस्के

योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने काढणी केल्यास काढणीपश्‍चात होणारे नुकसान काही प्रमाणात कमी होते. त्यासाठी भाजीपाला पिकांच्या काढणीसाठी योग्य परिपक्वतेची अवस्था आणि मापदंड माहिती असणे आवश्‍यक आहे.  दर्जेदार उत्पादनासाठी भाजीपाला पिकांची योग्य परिपक्वतेला काढणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने काढणी केल्यास काढणीपश्‍चात होणारे नुकसान काही प्रमाणात कमी होते. त्यासाठी भाजीपाला पिकांच्या काढणीसाठी योग्य परिपक्वतेची अवस्था आणि मापदंड माहिती असणे आवश्‍यक आहे.  योग्य परिपक्वतेला काढणीचे महत्त्व 

  •   नवीन फुलांची व फळांची संख्या वाढून उत्पादनात वाढ होते.
  •   पिकांची गुणवत्ता वाढून दर्जेदार उत्पादन मिळते.
  •   चव चांगली लागते.
  •   बाजारामध्ये जास्त मागणी व चांगले दर मिळतात.
  •   काढणीपश्‍चात होणारे नुकसान टाळता येते.
  • सर्व प्रकारच्या भाजीपाला पिकांच्या काढणीसाठी लागवडीपासून ते फळ येण्यास लागणारा काळ, फुले आल्यापासून ते फळे तयार होण्यास लागणारा काळ, जात, आकार, रंग, वजन, वापर, बाजारपेठेचे अंतर या बाबींचा विचार करणे गरजेचे असते. प्रत्येक भाजीपाला पिकाचा काढणी कालावधी हा वेगवेगळा असतो. त्यामुळे योग्य परिपक्वतेलाच पिकांची काढणी करावी. टोमॅटो 

  • रोप लावल्यापासून जातिपरत्वे ६० ते ६५ दिवसांत फळाची तोडणी सुरू होते. 
  • दूरच्या बाजारपेठेसाठी हिरव्या पक्व अवस्थेतील, मध्यम पल्ल्याच्या बाजापेठेसाठी गुलाबी लालसर झालेली फळे तर स्थानिक बाजारपेठेसाठी किंवा प्रक्रिया उद्योगासाठी पूर्ण लाल झालेली फळे काढावीत.
  • वांगी 

  • रोपांच्या लागवडीपासून साधारणतः १० ते १२ आठवड्यांनी फळे काढणीस तयार होतात. 
  • पूर्ण वाढलेली परंतु कोवळी, आकर्षक, चकचकीत आणि टवटवीत फळे काढावीत.
  • मिरची 

  • मिरची काढण्याची वेळ ही मिरचीच्या वापरावर अवलंबून असतो. 
  • लागवडीपासून ४५ ते ५० दिवसांनी हिरव्या फळांची तोडणी करण्यास सुरुवात होते. 
  • मिरच्या वाळवून साठवायच्या असतील तर ७० ते ८० दिवसांनी लाल रंगाची फळे तोडावीत.
  • भेंडी 

  • लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांत फळे काढणीस तयार होतात.
  • आकर्षक हिरवी, कोवळी, लसलशीत, ५ ते ६ सेंमी लांबीच्या फळांची एक दिवसाआड काढणी करावी. 
  • भेंडीची वारंवार तोडणी केल्याने जास्त फळे लागतात आणि उत्पादनातही भर पडते.
  • कांदा व लसूण 

  • लागवडीनंतर ३ ते ४ महिन्यांत कांदा पीक काढणीसाठी तयार होते. 
  • कांदा परिपक्व झाल्यानंतर पाने पिवळसर होतात, पात आडवी पडते यालाच ‘मान मोडणे’ असे म्हणतात. साधारणतः ६० ते ६५ टक्के माना पडल्यानंतर काढणीस सुरुवात करावी. 
  • लसणाचे पीक लागवडीनंतर ५ महिन्यांनी काढणीसाठी तयार होते. पात पिवळी पडून सुकायला लागल्यावर लसूण काढणीस सुरुवात करावी.
  • वेलवर्गीय भाजीपाला पिके 

  • यामध्ये काकडी, टिंडा, भोपळा, कारली, दोडके, घोसाळी, पडवळ, गिलके इत्यादी भाज्यांचा समावेश होतो. 
  • पूर्ण वाढ झालेली, परंतु कोवळ्या, आकर्षक फळांची काढणी करावी. 
  • काढणीस उशीर झाल्यास फळांची चव चांगली लागत नाही. बाजारभाव कमी मिळतो.
  • शेंगवर्गीय भाजीपाला पिके 

  • यामध्ये चवळी, गवार, वाल, घेवडा, वाटणा इत्यादी भाज्यांचा समावेश होतो.
  • भाजीसाठी हिरव्या कोवळ्या व पूर्ण वाढलेल्या शेंगाची नियमित काढणी करावी. तोडणीस उशीर झाल्यास शेंगाची गुणवत्ता खालावते.
  • कोबीवर्गीय भाजीपाला पिके 

  • यामध्ये पत्ता गोबी, फुलगोबी, ब्रोकोली आणि नवलखोल इत्यादींचा समावेश होतो. 
  • कोबीचे पीक जाती आणि हंगामानुसार २.५ ते ३ महिन्यांनी तयार होते. तयार झालेला कोबी गड्डा हाताने दाबल्यास घट्ट लागतो. अशा तयार झालेल्या गड्ड्याची काढणी करावी. 
  • फुल गोबीचे पूर्ण वाढलेले पांढरे गड्डे काढणीसाठी योग्य असतात. काढणीस उशीर झाल्यास गड्डे पिवळे होऊन घट्ट आणि कमी आकर्षक दिसतात.
  • नवलखोलची काढणी गड्डा ६ ते ७ सेंमी व्यासाचा झाल्यावर कोवळा असताना करावी.
  • पालेभाज्या  मेथी, पालक, चुका, शेपू इत्यादी पालेभाज्यांची काढणी हिरवी आणि कोवळी पाने असताना करावी.

    - बी. जी. म्हस्के,  ९०९६९६१८०१ (सहायक प्राध्यापक, एम.जी.एम. नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, जि. औरंगाबाद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

    Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

    Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

    Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

    Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

    SCROLL FOR NEXT