सध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेत प्रत्येक ठिकाणी पाऊस व पावसाळी वातावरण दिसून येते. बऱ्याच बागेत काडीच्या परिपक्वतेचा कालावधी असेल, तर आगाप छाटणी घेतलेल्या बागेत डोळे फुटण्याची अवस्था दिसून येईल. अशा परिस्थितीत पुढीलप्रमाणे व्यवस्थापन आवश्यक असेल. काडी परिपक्वतेची अवस्था डाऊनी मिल्ड्यू द्राक्ष बागेत वाढीच्या या अवस्थेत पाने जुनी झालेली आहेत. यावेळी पाऊस जास्त असल्यामुळे शेंडा वाढ जास्त प्रमाणात होते. या वाढीमुळे फुटींची लांबी जास्त वाढते. काही स्थितीत या फुटी जमिनीपर्यंत किंवा जमिनीलगत पोचतात. डाऊनी मिल्ड्यूसारख्या रोगाचे बीजाणूंचा जमिनीतून प्रसार होतो. ज्या वेळी दडक्याचा (जोराचा) पाऊस येतो, त्या वेळी जमिनीवर उपलब्ध इनाक्युलम पाण्याच्या थेंबासोबत पानावर जाऊन बसते. रोगाचा प्रसार होण्यास मदत होते. एकतर नवीन फुटी वाढत असल्यामुळे शेंड्याकडील फुटी कोवळ्या असतात. त्या डाऊनी मिल्ड्यू रोगाच्या प्रसाराला लवकर बळी पडतात. बऱ्याचदा आपल्या बागेत शेंड्याकडील नवीन फुटींवर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे चिन्हे दिसतात. या वेळी तापमान व आर्द्रता या रोगाच्या प्रसारासाठी एकदम पोषक असल्यामुळे आज जर दहा टक्के प्रसार दिसत असेल, तर उद्या ६० टक्क्यांपुढे प्रसार दिसून येईल. कोवळ्या फुटीवरून रोगाचा प्रसार जुन्या फुटीकडे वाढत जातो. काही दिवसांतच पानांमध्ये उपलब्ध रस शोषून घेतल्यामुळे पानगळ व्हायला सुरुवात होते. अशा काडीमध्ये अन्नद्रव्यांचा साठा पुरेसा होत नाही, परिणामी घडाच्या विकासात अडचणी येतात. उपाययोजना अशा बागेमध्ये खालील व्यवस्थापन महत्त्वाचे असेल.
तांबेरा जुन्या पानावर जास्त पाऊस झालेल्या परिस्थितीत तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसेल. पानाच्या खालील बाजूस तपकिरी रंगाचा भुकटी चिकटल्यासारखी दिसून येईल. जुन्या पानांवर या रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो. प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून रोगाचे बीजाणू एक आठवड्याच्या आत पानातून रस शोषून घेतात, त्यामुळे पानाच्या वाट्या होतात. बागेतील पूर्ण पाने सुकतात. जास्त प्रादुर्भावाच्या स्थितीत द्राक्षवेल पूर्ण सुकलेली दिसून येते. फळछाटणीला उशीर असलेल्या परिस्थितीत पाने गळून पडल्यामुळे एकतर काडीमध्ये अन्नद्रव्यांचा साठा गोळा करण्यास अडचणी येतील. काही परिस्थितीत डोळे फुटण्यास सुरुवात होईल. अशा परिस्थितीत बागेत बुरशीनाशकांची फवारणी त्वरित करणे आवश्यक असेल. उपाययोजना
आगाप छाटणी या बागेत पावसाळी वातावरणामुळे पोंगा अवस्थेतील बागेत घड जिरण्याची समस्या दिसून येते. महत्त्वाचे म्हणजे जास्त पाऊस झालेल्या परिस्थितीत, ढगाळ वातावरण किंवा जमिनीत जास्त ओलावा असल्याच्या स्थितीत वेलीमध्ये जिबरेलिन्सचे प्रमाण जास्त वाढते. परिणामी, वेलीचा जोम वाढण्यास सुरुवात होते. या वेळी फूट निघालेली नसल्यामुळे जोम वाढण्याचा प्रश्न नाही, असे आपल्याला वाटते. मात्र वेलीत शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग झपाट्याने वाढल्यामुळे सायटोकायनीनचे प्रमाण कमी होते. एकूणच शरीरशास्त्रीय हालचालींचे संतुलन बिघडते. परिणामी, डोळा फुटल्यानंतर निघालेल्या फुटीवर द्राक्ष घडाच्या ऐवजी निघत असलेल्या घडाचे रूपांतर एकतर बाळीमध्ये होते किंवा गोळी घड तयार होतो. बऱ्याचदा जमीन सपाट असलेल्या परिस्थितीत बोदामध्ये पाणी साचलेले असते, त्याच सोबत दोन ओळींतील उपलब्ध जागेमध्येही पाणी साचते. यामुळे वेलीची मुळे कार्य करण्यासाठी सक्षम राहत नाहीत. उपाययोजना
- डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.