Dattatraya Shendkar has used drip for efficient use of water. 
कृषी सल्ला

शेतकरी नियोजन पीक : गुलाब

sandeep navale

‘व्हॅलेंटाइन डे’ला बाजारामध्ये गुलाब फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे जवळपास महिनाभर आधीपासून गुलाब फुलांचे उत्पादन घेण्यासाठी नियोजन करण्यात आले. गुलाब लागवडीमध्ये ठिबक सिंचन पद्धत वापरल्यामुळे मागील वर्षी फुलांच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के वाढ झाली. सध्या हंगाम संपत आल्याने गुलाब शेतातील विविध कामे करण्यावर भर देत आहे. शेतकरी ः दत्तात्रय शेंडकर गाव ः चांबळी, ता. सासवड, जि. पुणे गुलाब लागवड ः एक एकर माझी चांबळी (ता. सासवड) येथे डोंगराच्या पायथ्याला ८ एकर शेती आहे. त्यामध्ये गुलाब, शेवंती, ॲस्टर, बिजली या फुलपिकांची सव्वा दोन एकरांवर, तर उर्वरित क्षेत्रामध्ये वाटाणा, गहू, हरभरा आणि सीताफळ लागवड आहे. त्यापैकी साधारण १ एकर क्षेत्रावर गुलाबाच्या सोप्या वाणाची लागवड आहे. आमच्या भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पारंपरिक सिंचन पद्धतीचा अभ्यास करून मागील सहा वर्षांपासून ठिबकचा अवलंब केला आहे. त्यानुसार पीक पद्धती ठरविली जाते. ‘व्हॅलेंटाइन डे’ला बाजारामध्ये गुलाब फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे जवळपास महिनाभर आधीपासून गुलाब फुलांचे उत्पादन घेण्यासाठी नियोजन करण्यात आले. गुलाब लागवडीमध्ये ठिबक सिंचन पद्धत वापरल्यामुळे मागील वर्षी फुलांच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के वाढ झाली. सध्या हंगाम संपत आल्याने गुलाब शेतातील विविध कामे करण्यावर भर देत आहे. शेततळ्यांची उभारणी  कृषी विभागाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी शेतामध्ये १२० बाय १२० फुटाचे शेततळे घेतले आहे. त्यासाठी जवळपास सहा लाख रुपयांचा खर्च आला. शेततळ्यातील उपलब्ध पाण्याचा वापर जानेवारीनंतर केला जातो. त्यामुळे अडचणीच्या काळात शेततळ्यांतील पाण्याचा पिकांना चांगला आधार मिळतो. मागील महिनाभरातील कामकाज 

  • कटिंग, बेडिंग, क्लिपिंग, योग्यरीत्या मशागत अशी विविध कामे करण्यात आली.
  • अधिक उत्पादनासाठी शेणखत, निंबोळी पेंड, कोंबडी खत, जैविक खते ही खते महिन्यातून एक वेळ दिली.
  • आवश्यकतेनुसार कीड-रोगांचा प्रादुर्भाव पाहून उपाययोजनांचा अवलंब केला.
  • गुलाब शेतीमध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला आहे. त्यानुसार ४ ते ५ दिवसांनी ठिबकद्वारे पाणी दिले.
  • ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या काळात गुलाब फुलांना मोठी मागणी होती. त्यानुसार प्रतिदिन साधारण ४०० ते १००० फुलांची काढणी केली. या काळात साधारण साडे ७ हजार फुलांचे फुलांचे उत्पादन मिळाले.
  • काढलेल्या फुलांची गड्डीची पॅकिंग करून विक्रीसाठी पाठविले जाते. एका गड्डीत साधारण १२ फुले असतात. प्रति गड्डी साधारण ४० ते ५० रुपये इतका दर मिळाला.
  • आगामी कामकाज 

  • साधारण एप्रिल महिन्यानंतर पाण्याचा ताण दिला जाईल.
  • खत व्यवस्थापनामध्ये १०:२६:२६, कॅल्शिअम, बोरॉन, पोटॅश यांची मात्रा दिली जाईल.
  •  तापमानाचा अंदाज घेऊन ठिबकचा कालावधी वाढविला जाईल.
  • दर महिन्याला मजुरांच्या मदतीने झाडांजवळील तण काढले जाईल.
  •  फुलांवर कोणत्याही कीड व रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात येईल.
  • - दत्तात्रय शेंडकर, ९९२२६१२५८५  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

    Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

    Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

    FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

    Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

    SCROLL FOR NEXT