आंबा पिकावरील तुडतुडे आणि आंबा पिकावरील तुडतुडे
पालवी आणि मोहोर अवस्थेत असलेल्या आंब्यावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास पावसाची उघडीप पाहून तसेच फवारणी द्रावणात स्टीकर मिसळून फवारणी करावी. हवामान अंदाज दिनांक ३० नोव्हेंबर पासून पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन फवारणीचे नियोजन करावे. आंबा
पालवी ते मोहोर अवस्थापालवी आणि मोहोर अवस्थेत असलेल्या आंब्यावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास पावसाची उघडीप पाहून तसेच फवारणी द्रावणात स्टीकर मिसळून फवारणी करावी. पालवी आणि मोहोर अवस्थेतील आंबा बागेमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. आंब्याचा मोहोर करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे करपला असल्यास दुपारी कडक उन्हामध्ये झाडावरील मोहोर झाडून घ्यावा. नियंत्रणासाठी, ॲझॉक्सिस्ट्रोबीन (२३ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.पालवी अवस्थेतील आंब्यावर तुडतुड्यांच्या प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. किडीच्या प्रादुर्भावासाठी कोवळ्या पालवीचे निरीक्षण करावे. प्रादुर्भाव दिसून आल्यास, डेल्टामेथ्रीन (२.८% प्रवाही) ०.९ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून संपूर्ण झाडावर तसेच खोडावर फवारणी करावी.बोंगे फुटण्याच्या अवस्थेत असलेल्या आंब्यावर तुडतुडे व भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी, फवारणी (प्रमाण -प्रति लिटर पाणी) लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. अधिक हेक्झाकोनॅझोल (५% प्रवाही) ०.५ मि.लि. किंवा गंधक (पाण्यात विरघळणारे ८० टक्के) २ ग्रॅम.मोहोर फुटलेल्या आंबा बागेमध्ये मोहोरावर तुडतुडे, मिजमाशी इ. किडी व भुरी रोगांचा प्रादुर्भाव होतो. मोहोर फुलण्यापूर्वी तुडतुडे आणि मिजमाशीच्या नियंत्रणासाठी, फवारणी (प्रमाण -प्रति लिटर पाणी) इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ०.३ मि.लि. किंवा ब्युफ्रोफेझीन (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि.भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी, फवारणी (प्रमाण -प्रति लिटर पाणी) हेक्झाकोनॅझोल (५ टक्के) ०.५ मि. ली. किंवा गंधक (पाण्यात विरघळणारे ८० टक्के) २ ग्रॅम. (लेबलक्लेम शिफारशी आहेत.) (टीप : मोहोर नुकताच फुलत असताना ते फलधारणा होईपर्यंत कीटकनाशकाची फवारणी टाळावी. फवारणी करणे गरजेचीच असल्यास बागेतील परागीकरण करणाऱ्या कीटकांवर होणारा परिणाम टाळण्याच्या दृष्टीने फवारणीचा कालावधी ठरवावा. ) काजू
मोहोर अवस्थामोहोर अवस्थेतील काजूवर ढेकण्या (टी मोस्किटो बग) किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही कीड मोहोरातील रस शोषते. त्यामुळे मोहोर सुकून जातो. नियंत्रणासाठी (प्रमाण -प्रति लिटर पाणी) प्रोफेनोफॉस (५० टक्के प्रवाही) १ मि.लि. (लेबल क्लेम नाही, ॲग्रेस्को शिफारस)पुनर्लागवडवांग्याच्या ४ ते ६ आठवडा वयाच्या रोपांची पुनर्लागवड सरी वरंब्यावर ७५ x ७५ से.मी. किंवा ७५ x ६० से.मी. किंवा ६० x ६० से.मी. अंतरावर करावी.लागवडीच्या वेळेस ७५० ग्रॅम चांगले कुजलेले शेणखत, ४ ग्रॅम युरिया, ११ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि ३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति रोप या प्रमाणे खताची मात्रा द्यावी. लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे.रोपांचे मर रोगापासून संरक्षण करण्याकरिता पुनर्लागवड करतेवेळी रोपांची मुळे क्लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) २.५ मि.लि. प्रति लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ०.३ मि.लि.प्रति लिटर पाणी या द्रावणात ५ मिनिटे बुडवून लागवड करावी.पुनर्लागवडीच्या वेळी ट्रायकोडर्मा २ ग्रॅम प्रति रोप शेणखतासोबत मिसळून देण्यात यावे.पेरणीमुळा, माठ, कोथींबीर पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी आणि उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी.माठ आणि कोथींबीर लागवडीसाठी २०० ते २५० किलो आणि मुळे पिकासाठी १०० किलो चांगले कुजलेले शेणखत आणि १५:१५:१५ हे खत ४ किलो प्रति गुंठा या प्रमाणे द्यावी.माठ, कोथींबीर बियाण्याची दोन ओळीत २० ते २५ सें.मी. तर मुळ्याची ४५ ते ६० सें.मी. अंतर ठेवून पेरणी करावी.पेरणी टप्प्याटप्प्याने आठवड्याच्या किंवा १५ दिवसांच्या अंतराने केल्यास दर ठराविक काळाने उत्पादन हाती येते.पेरणीभुईमुगाची लागवडीसाठी जमिनीची नांगरट करून जमीन सपाट करून घ्यावी. जमिनीमध्ये प्रति गुंठा १०० ते १५० किलो चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.पेरणी ३० x १५ सें.मी. (उपट्या जातीसाठी) आणि ४५ x १५ सें.मी. (निमपसऱ्या आणि पसऱ्या जातीसाठी) अंतरावर टोकण पद्धतीने करावी.पेरणीच्या वेळी युरिया ५५० ग्रॅम , सिंगल सुपर फॉस्फेट ३ किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश ५०० ग्रॅम प्रति एकरी खतांच्या पूर्ण मात्रा द्याव्यात.तणांच्या बंदोबस्तासाठी पेंडिमिथॅलिन (३० ई.सी.) तणनाशकाची ५.५ मि.ली. प्रति लिटर पाणी याप्रमाणे पेरणीनंतर लगेच मातीच्या ओल्या पृष्ठभागावर एकसारखी फवारणी करावी.मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात चोळावे. यानंतर रायझोबिअम २० ग्रॅम आणि स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धक ५० ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रक्रिया करावी.पेरणीमधुमका पिकाच्या लागवडीसाठी नांगरणीच्या वेळेस प्रति गुंठा १०० ते १२० किलो चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट मातीत मिसळावे. पिकास पाणी देण्यासाठी वाफे तयार करावेत.पेरणी टोकण पद्धतीने ६० x २० सें. मी. अंतरावर करावी. एका ठिकाणी दोन दाणे सुमारे ४ ते ५ सें. मी. खोलीवर पेरावे.पेरणीच्या वेळी ओळीमध्ये ७ ते ८ सें.मी. खोलीवर प्रति गुंठा युरिया २ किलो, सिंगल सुपर फॉस्फेट ४ किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश १ किलो या प्रमाणे खतमात्रा द्यावी.पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी. यानंतर ॲझोटोबॅक्टर २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया करावी. पेरणीनंतर हलके पाणी द्यावे.पेरणीचवळी पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची मशागत करावी. नांगरणीच्या वेळेस प्रति गुंठा ५० किलो चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्टखत मिसळून जमीन समपातळीत आणावी. उताराच्या आडव्या दिशेने ४ x ३ मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करावेत. दोन वाफ्यामध्ये पाण्याचे पाट ठेवावेत.बियाण्याची पेरणी ३० x १५ सें.मी. अंतरावर करावी.पेरणी वेळी ६५ ग्रॅम युरिया, ४५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि ८० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति वाफा द्यावी.पेरणी करताना पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम बुरशीनाशकाची किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी. बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर पेरणीपूर्वी १ तास आधी रायझोबिअम २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया करावी. बियाणे सावलीत सुकवावे. - ०२३५८ -२८२३८७, डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१ (ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना आणि कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)