Thrips on onion
Thrips on onion  
कृषी सल्ला

कृषी सल्ला (कपाशी, सोयाबीन, तूर, वांगी, हरभरा, कांदा, टोमॅटो)

प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

कपाशी

  • फुले उमलणे ते बोंड धरणे
  • बागायती क्षेत्रातील भारी जमिनीत विशेषतः रासायनिक खते व पाणी यांचे प्रमाण जास्त झाल्यास संकरित वाणाची कायिक वाढ जास्त होते. बोंडाच्या वजनामुळे फांद्या मोडण्याची शक्यता असते. त्यासाठी पीक ८० दिवसांचे झाल्यावर मुख्य फांदीचा शेंडा खुडावा. यामुळे पिकाची कायिक वाढ मर्यादित होते.
  • सोयाबीन

  • शेंगा सुटण्याची अवस्था
  • पाने खाणाऱ्या (स्पोडोप्टोरा लिट्यूरा) अळीच्या प्रादुर्भावाचा आगाऊ अंदाज समजण्यासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे ५० मीटर अंतरावर शेतात उभारावेत.
  • हवेतील आर्द्रता ७५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास उघडीप मिळाल्यानंतर हिरव्या उंट अळीच्या व्यवस्थापनासाठी, प्रोफेनोफॉस (५०% प्रवाही) २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • तूर

  • फांद्या फुटण्याची अवस्था
  • खोड माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.
  • वांझ रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच अशी रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. वांझ रोगाचा प्रसार कोळी या कीटकामार्फत होतो. कोळी नियंत्रणासाठी कोळीनाशकाची फवारणी करावी.
  • हरभरा रब्बीसाठी कोरडवाहू हरभरा पीक पेरणीसाठी जमिनीची मशागत करावी. खरीप हंगामातील पीक काढणीनंतर काडीकचरा व धसकटे गोळा करून घ्यावीत. कोरडवाहू हरभरा पिकाची पेरणी २० सप्टेंबरपासून पुढे करावी. कांदा फुलकिडे व करपा आढळून आल्यास, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) ६ मि.लि. अधिक टेब्यूकोनॅझोल १० मि.लि. अधिक स्टिकर १० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. टोमॅटो रसशोषक किडींच्या नियंत्रणाकरिता, इमिडाक्लोप्रीड ५ मि.लि. किंवा थायामेथोक्‍झाम ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. वांगी

  • वांगी पिकावर शेंडे व फळ पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी एकात्मिक कीडनियंत्रण -
  • कीडग्रस्त शेंडे दर आठवड्यातून एकदा खुडून नष्ट करावेत.
  • तोडणीनंतर कीडग्रस्त फळे गोळा करून जमिनीत गाडून टाकावीत.
  • अळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन (१०% प्रवाही) १० मि.लि. किंवा इंडोक्झाकार्ब (१४.५ ईसी) १० मि.लि. किंवा स्पिनोसॅड (४५ ईसी) ५ मि.लि. किंवा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ३ मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. अधून-मधून निंबोळी अर्क (५ टक्के) ची फवारणी करावी.
  • -  ०२४२६-२४३२३९ (प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

    Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

    Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

    Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

    Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

    SCROLL FOR NEXT