fruit borer in brinjal 
कृषी सल्ला

कृषी सल्ला (तूर, मूग, उडीद, सोयाबीन, मका)

काकडी, दुधी भोपळा, दोडका, घोसाळी या पिकांवर विषाणूजन्य रोगाचा प्रसार फुलकिडे, पांढरी माशी व मावा इत्यादी रस शोषणाऱ्या किडींमार्फत होतो. योग्य वेळी नियंत्रण केल्यास विषाणूजन्य रोगांचा प्रसार कमी होतो.

प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

काकडी, दुधी भोपळा, दोडका, घोसाळी या पिकांवर विषाणूजन्य रोगाचा प्रसार फुलकिडे, पांढरी माशी व मावा इत्यादी रस शोषणाऱ्या किडींमार्फत होतो. योग्य वेळी नियंत्रण केल्यास विषाणूजन्य रोगांचा प्रसार कमी होतो. तूर 

  • फांद्या फुटण्याची अवस्था
  • वांझ रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावी.
  • फवारणी प्रतिलिटर पाणी फेनाझाक्विन (१० ईसी) १ मिलि
  • मूग, उडीद

  • काढणी
  • मुगाच्या शेंगा ७५ टक्के वाळल्यावर पहिली तोडणी व त्यानंतर ८ ते १० दिवसांनी राहिलेल्या सर्व शेंगा तोडाव्यात.
  • सोयाबीन

  • शेंगा सुटण्याची अवस्था
  • उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून येताच, एकरी ८ ते १० पक्षी थांबे शेतात लावावेत. शेत तणमुक्त ठेवावे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेकरिता निंबोळी अर्क ५ टक्के किंवा
  • अझाडिरेक्टीन ५ मिलि (१००० पीपीएम)
  • भुईमूग 

  • आऱ्या उतरण्याची अवस्था
  • स्पोडोप्टेरा अळीच्या व्यवस्थापनाकरिता, एस.एल.एन.पी.व्ही. १ मिलि अधिक बिव्हेरिया बॅसियाना ५ ग्रॅम याप्रमाणे १० लिटर पाण्यात मिसळून संध्याकाळी फवारणी करावी.
  • मका

  • तुरा बाहेर पडताना व फुलोऱ्यात असताना
  • अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास,
  • नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी)
  • स्पिनेटोरम ०.५ मिलि
  • अळीच्या निरिक्षणासाठी एकरी चार कामगंध सापळे लावावेत.
  • कपाशी 

  • फुले उमलणे ते बोंड धरणे फुलकिडे नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी) फिप्रोनील (५% प्रवाही) १.२ मिलि किंवा थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) २ ग्रॅम
  • कांदा फुलकिडी व करपा रोग  नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी)

  • लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ०.६ मिलि + टेब्युकोनॅझोल १ मिलि (संयुक्त कीटकनाशक) + स्टिकर १ मिलि
  • गरजेनुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने नॅपसॅक पंपाने फवारावे.
  • काकडी, दुधी भोपळा, दोडका, घोसाळी 

  • पिकांवर विषाणूजन्य रोगाचा प्रसार फुलकिडे, पांढरी माशी व मावा इत्यादी रस शोषणाऱ्या किडींमार्फत होतो. योग्य वेळी नियंत्रण केल्यास विषाणूजन्य रोगांचा प्रसार कमी होतो.
  • नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी)

  • थायोमेथोक्झाम (२५ डल्ल्यूजी) ०.४ ग्रॅम
  • फवारण्या फुले येण्यापूर्वी कराव्यात. फुले आल्यानंतर शक्यतो फवारणी करू नये.
  • फळमाशीच्या नियंत्रणासाठी एकरी ५ क्ल्यू-ल्यूर कामगंध सापळे वापरावे.
  • वांगी

  • शेंडा व फळ पोखरणारी अळीसाठी एकात्मिक कीडनियंत्रण करावे.
  • दर आठवड्यातून एकदा कीडग्रस्त शेंडे खुडून नष्ट करावेत.
  • कीडग्रस्त फळे गोळा करून जमिनीत गाडून टाकावीत.
  • नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी)

  • इंडोक्झाकार्ब (१४.५ ईसी) १ मिलि किंवा
  • स्पीनोसॅड (४५ ईसी) ०.५ मिलि किंवा
  • क्लोरॲन्ट्रानीलिप्रोल (१८.५ एससी) ०.३ मिलि
  • फळ पोखरणारी अळी   नियंत्रण  (फवारणी प्रतिलिटर पाणी)

  • क्विनॉलफॉस (२५ ईसी) २ मिलि किंवा
  • डेल्टामेथ्रीन (२.८ ईसी) ०.८ मिलि किंवा
  • इमामेक्टीन बेन्झोएट (५ डब्लूजी) ०.४ ग्रॅम
  • नॅपसॅक पंपाने फवारणी करावी.
  • संपर्क ः ०२४२६-२४३२३९ (प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Namo 8th Installment : नमो शेतकरी महासन्मान निधीच्या आठव्या हप्त्यासाठी निधी मंजूर; शासन निर्णय जारी

    MRGS Scheme: ‘एमआरजीएस’ योजनेत पाच कोटींच्या निधीवर प्रश्नचिन्ह

    Freedom Of Religion Bill: धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६ विधानसभेत सादर; मुस्लिम समाज लक्ष्य असल्याचा विरोधकांचा दावा

    Sugar Factory Action: सोलापूर जिल्ह्यातील ६ साखर कारखान्यांवर जप्तीचा प्रस्ताव

    Millet Farming: कुरुलमध्ये राळा, वरई, भगरीचा प्रयोग,संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांकडून पाहणी

    SCROLL FOR NEXT