cassava fried chips
cassava fried chips 
कृषी प्रक्रिया

कसावापासून स्नॅक्‍सनिर्मिती

डॉ. संकेत मोरे,डॉ. नम्रता गिरी

अन्न सुरक्षेच्या दृष्टीने कसावा महत्त्वाचे पीक आहे. कसावापासून २०० ते ५०० कॅलरी मिळतात. यामध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त कार्बोदके आहेत. कंदाच्या पानांमध्ये प्रथिने आणि काही प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत.  उकडलेला कंद  घरगुती खाद्य म्हणून कंदाचा वापर केला जातो. कंद स्वच्छ धुवून त्याची साल काढली जाते. एका भांड्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी टाकून कंद मऊ होईपर्यंत उकडावा. उकडल्यानंतर पाणी फेकून द्यावे. शिजवलेला कंद रस्सा भाजी किंवा इतर पदार्थांसोबत खाऊ शकतो.  तळलेले स्नॅक्‍स  कसावा पक्का वडा कसावा पिठासोबत मैदा, हरभराडाळीचे पीठ, मीठ, मिरची पावडर, सोडा, हिंग व तेल वापरून हा पदार्थ तयार करतात. हे सर्व घटक एकत्रित करून त्याची मऊसर कणीक केली जाते. ही कणीक  वेगवेगळ्या साच्यामध्ये बसवून आकार दिला जातो. त्यानंतर तळले  जाते.

कसावा स्वीट फ्राइस  हा पदार्थ तयार करण्यासाठी कसावा पीठ, मैदा, सोडा व तेल वापरले जाते. हे सर्व घटक एकत्र करून कणीक मळली जाते. कणीक एक तास तशीच मळून ठेवली जाते. त्यानंतर साच्याचा साह्याने वेगवेगळे आकार बनवून गरम तेलात तळली जाते. त्यानंतर त्याला साखरेच्या पाकात बुडवून वरून लेप  लावला जातो. 

कसावा शेवया व पास्ता   कसावा पीठ, मैदा आणि मीठ एकत्र करून कणीक मळली जाते. शेवया आणि पास्ता यंत्राच्या साह्याने बनवून वाळवतात.

बेकरी पदार्थ  मैद्याचा काही भाग आणि कसावा पिठाचा वापर  करून बिस्किटे, कुकीज, कप केक, केक, ब्रेड तयार करतात.

कसावा पिकाचे महत्त्व 

  • कसावा हे महत्त्वाचे कंदपीक आहे. यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते. भारताचा विचार करता तमिळनाडू आणि केरळमध्ये सर्वात जास्त कसावा लागवड आहे.
  • कसावाची प्रतिहेक्टरी उत्पादनक्षमता ७० ते ९० टन आहे, परंतु आपल्याकडे प्रतिहेक्टरी २५ ते ३० टन उत्पादन मिळते. याचे मुख्य कारण म्हणजे पारंपरिक पद्धतीने पीक लागवड आणि व्यवस्थापन. याचबरोबरीने सुधारित जातींची अत्यंत कमी प्रमाणात लागवड आहे. येत्या काळात या पिकामध्ये चांगली संधी आहे. केंद्रीय कंद पिके संशोधन संस्थेने कसावाच्या १९ सुधारित जाती विकसित केलेल्या आहेत. यातील काही जाती रोग प्रतिकारक, लवकर तयार होणाऱ्या जाती आहेत.
  • याचबरोबरीने स्टार्च निर्मितीसाठीदेखील उपयुक्त आहेत.
  • संस्थेने स्टार्चचे प्रमाण अधिक असलेल्या कसावाच्या जाती विकसीत केल्या आहेत. यामध्ये श्री रेखा (२७ ते ३१ टक्के), श्री शक्ती (२७ ते ३२ टक्के), श्री अतुल्या (३०.२ टक्के), श्री प्रभा (२६ ते २९ टक्के), श्री प्रकाश (२९ ते ३१ टक्के), श्री सध्या (२९ ते ३१ टक्के) या जातींचा समावेश होतो. हे पीक १० ते १२ महिन्यांत तयार होते.
  • बाजारपेठेतील मागणीनुसार हे पीक १ ते २ महिने काढणी न करता शेतात ठेवू शकतो. मात्र, कंद काढणीनंतर २ ते ३ दिवसांत त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
  • - डॉ. संकेत मोरे, ९६०१२६६६३६    - डॉ. नम्रता गिरी, ७०१२०२७९२७     (केंद्रीय कंद पीक संशोधन संस्था, त्रिवेंद्रम, केरळ)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT