प्रक्रिया, औषधीनिर्मितीमध्ये जांभळाला मागणी 
कृषी प्रक्रिया

प्रक्रिया, औषधीनिर्मितीमध्ये जांभळाला मागणी

जी. बी. देसाई

जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे. त्याच्या बियांचे आरोग्यदायी फायदे आहेत. अतिसार, खोकला, पित्त, शोष, दाह, रक्तदोष, कंठरोग आजारांवर जांभूळ उपयुक्त आहे.

जां भूळ तुरट, मधुर, पाचक व मलस्तंभक आहे. रूक्ष, रुचीकर, आंबट, कंठाला हितकर असून, पित्त दाह, कृमी, श्वास, शोष, अतिसार, कास, रक्तदोष, कफ, व्रण यांचा नाश करते. जांभळांना खाण्यासाठी तसेच प्रक्रिया पदार्थांची निर्मिती आणि आयुर्वेदिक औषधी बनविण्यासाठी मागणी आहे.

जांभळाच्या बियांपासून पावडर

  • जांभळाच्या बियांची भुकटी फार गुणकारी असते. त्याकरिता गर काढल्यानंतर शिल्लक बिया स्वच्छ पाण्याने धुवून उन्हात वाळवाव्यात. त्या वाळलेल्या बियांची ग्राईडरमधून भुकटी तयार करावी. या भुकटीचा वापर अतिसार, खोकला, पित्त, शोष, दाह, रक्तदोष, कंठरोग इत्यादी रोगात बरा होतो.
  • पिकलेल्या, निरोगी, चांगल्या फळाची निवड करावी. फळे पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. ब्रश टाईप पल्पर यंत्रातून गर काढावा. बिया पाण्याने स्वच्छ धुवाव्यात. बिया ड्रायरमधील ट्रे मध्ये पातळ पसराव्यात.
  • ट्रे ड्रायरमध्ये बिया वळविण्यासाठी १८ ते २० तास ठेवाव्यात. (तापमान ५५ ते ६० अंश सेल्सिअस)
  • सुकलेल्या बियांची ग्राईडरमधून पावडर तयार करावी. ही पावडर वस्त्रगाळ करावी. वजन करून पिशव्यांमध्ये भरावी. पिशवी हवाबंद करून, थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात.
  • आरोग्यदायी फायदे

  • जांभूळाच्या बिया वर्षभर औषध म्हणून वापरता येतात.
  • जांभळात फ्लेवोनोइड भरपूर प्रमाणात असतात. हे शरीरातील हानिकारक घटक बाहेर टाकण्यास मदत करतात.
  • जांभळाच्या बियांमध्ये ‘ग्लुकोसाईड जांबोलिन’ हा ग्लुकोजचा प्रकार असल्यामुळे साखर वाढल्यावर हा घटक पिष्टमय पदार्थाचे साखरेत रूपांतर करण्यावर आळा घालतो. बिया सुकवून त्याची पावडर करावी. पाण्यासोबत ही पावडर सकाळी रिकाम्या पोटी घ्यावी. त्यामुळे देखील मधुमेह नियंत्रित राहील. हा उपाय पारंपरिक असून अतिशय परिणामकारक आहे. त्यामुळे मधुमेहाचा शरीरावर होणारा दुष्परिणाम कमी होतो.
  • पचन संस्था स्वच्छ करण्यासाठी आणि पोटाचे विकार दूर करण्यासाठी जांभूळ उपयुक्त आहे. बियांचा अर्क जखम किंवा आतड्यातील अल्सर दूर करण्यास फायदेशीर आहे. जुलाब झाल्यास जांभळाच्या बियांची पावडर साखरेत मिसळून दिवसातून २ ते ३ वेळा घ्यावी.
  • मधुमेहासोबतच रक्तदाबाचा त्रास कमी करण्यास जांभूळ फायदेशीर आहे. बियांचा रस किंवा अर्क नियमित घेतल्यास रक्तदाब ३४.६ टक्‍क्यांनी कमी होतो. त्यात असलेल्या घटकांच्यामध्ये रक्तदाब विरोधी गुणधर्म असतात.
  • जांभळात मोठ्या प्रमाणात ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व असते. तसेच खनिजेही असतात. त्याचा उपयोग डोळ्यांचे आणि त्वचेचे आरोग्य सुदृढ ठेवण्यास होतो. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. बियांची पावडर गायीच्या दुधात मिसळून हा लेप चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील मुरूम, पुटकुळ्या निघून जातात.
  • यकृताची कार्यक्षमता वाढवून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ७ ते ८ जांभळे चारपट पाण्यात भिजत घालून नंतर १५ मिनिटे उकळवावीत. त्यानंतर बीसह जांभळाचा पाण्यामध्ये लगदा करावा. हे द्रावण दिवसभरात ३ ते ४ वेळा प्यावे. यामुळे रक्तातील वाढलेली साखर कमी होते. यकृत कार्यक्षम होऊन विविध आजारांविरुद्ध रोगप्रतिकारकशक्ती तयार होते.
  •  - जी. बी. देसाई, ९८८१८४२५२५ (अन्न अभियांत्रिकी विभाग, अन्न तंत्र महाविद्यालय, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

    Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

    Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

    Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

    Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

    SCROLL FOR NEXT