Yogurt
Yogurt 
कृषी प्रक्रिया

आरोग्यवर्धक योगर्ट

शैलेंद्र कटके, प्रा. हेमंत देशपांडे

योगर्ट हे कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, फॉस्फरस, झिंक, पोटॅशिअम, आयोडीन आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. याशिवाय त्यात मोठ्या प्रमाणात प्रोबायोटीक्स असतात. योगर्ट बनविण्यासाठी गाय, म्हैस, शेळीच्या दुधाचा वापर केला जातो. योगर्टसाठी वापरण्यात येणाऱ्या उपयुक्त जिवाणूला  ‘योगर्ट कल्चर’ म्हणतात. जेव्हा हे उपयुक्त जिवाणू दुधात टाकले जाते, त्यानंतर दुधातील लॅक्टोज आंबते आणि ‘लॅक्टिक अॅसिड’ तयार होते. लॅक्टिक अॅसिडमुळे दूध घट्ट होते आणि त्याला योगर्टची विशिष्ट चव येते. हे तयार झालेले योगर्ट त्यानंतर थंड केले जाते आणि त्यात आवडीनुसार स्वाद मिसळले जातात. आपण ‘फ्लेवर्ड योगर्ट’ म्हणतो. लॅक्टिक अॅसिड बनविणाऱ्या ‘योगर्ट कल्चर’मुळे आंबटगोड चव येते. ज्या लोकांना डेअरी प्रोडक्ट्सपासून ॲलर्जी असते ते देखील योगर्ट खाऊ शकतात. कारण यामध्ये लॅक्टोज नसल्याने त्यापासून होणारी ॲलर्जी होत नाही. योगर्ट हे कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, फॉस्फरस, झिंक, पोटॅशिअम, आयोडीन आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. याशिवाय त्यात मोठ्या प्रमाणात प्रोबायोटिक्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. म्हणून योगर्ट खाणे शरीरासाठी चांगले असते. योगर्ट उत्पादन 

  • लॅक्‍टोबेसिलाय जिवाणूंच्या मदतीने तयार झालेल्या दह्याला योगर्ट म्हणतात. त्यांचे औद्योगिक उत्पादन करताना प्रथिनांचे प्रमाण योग्य राखण्यासाठी दुधात प्रथिनांसाठी दुधाची पावडर मिसळली जाते. 
  • दूध तापवून कोमट करून त्यात “स्ट्रेप्टोकॉकस थर्माफिलीस व लॅक्‍टोबॅसिलस डेलब्रुकी” या जिवाणूंचे १:१ प्रमाणातील मिश्रण मिसळले जाते. 
  • लॅक्टिक आम्ल तयार होऊन प्रथिनांचे जेल बनून घट्टपणा येतो.लॅक्‍टोबॅसिलसमुळे “अँसेटालडीहाइड” सारखी संयुगे बनतात. विशिष्ट स्वाद मिळतो. 
  • योगर्टमध्ये फळांचे रस मिसळून विविध स्वाद निर्माण केले जातात. उदा. स्ट्रॉबेरी योगर्ट, बनाना योगर्ट. योगर्टचे पाश्चरीकरण करून ते जास्त टिकवता येते. त्यातील प्रोबायोटिक गुणधर्म वाढतात.
  • दही आणि योगर्ट हे दोन्ही पदार्थ जरी सारखे वाटत असले तरी ते एकसारखे नाहीत. हे दुग्धजन्य पदार्थांचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांची चवही जवळजवळ सारखीच असते. दही आणि योगर्ट हे जरी एकसारखे वाटत असले तरी ते बनविण्याच्या पद्धतीपासून ते त्यांच्यातील पोषक तत्त्वांपर्यंत सर्वच भिन्न आहे. म्हणून हे दोन्ही पदार्थही वेगवेगळे आहेत. दह्यामध्ये योगर्टपेक्षा जास्त आंबटपणा असतो. योगर्टच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात.
  • योगर्टचे आरोग्यदायी फायदे 

  • योगर्टमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअमचे मुबलक प्रमाण असते. त्यामुळे योगर्ट खाणे  हाडे व दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. 
  • योगर्ट खाण्यामुळे  हाडे ठिसूळ होऊन ‘ऑस्टिओपोरोसिस’ होण्याचा धोकाही कमी होतो.
  • योगर्टमध्ये प्रोबायोटिक्स हे घटक असतात. त्यामुळे योगर्ट खाण्यामुळे पचन क्रिया व्यवस्थित होण्यास मदत होते. 
  • योगर्ट खाण्यामुळे  पोटफुगी, अतिसार, बद्धकोष्ठता यासारख्या पचनासंबंधी समस्या दूर होतात. योगर्ट खाण्यामुळे तोंडाला रुची येण्यास मदत होते.
  • योगर्टमध्ये प्रोबायोटिक्स या घटकाबरोबर विविध जीवनसत्त्व आणि खनिजेसुद्धा भरपूर प्रमाणात असतात. योगर्ट खाण्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
  • योगर्टमध्ये सॅच्युरेटेड फॅटचे  प्रमाण अधिक असते. योगर्ट खाण्यामुळे रक्तातील चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यास व रक्तदाब आटोक्यात राहत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. ब्लडप्रेशर नियंत्रित राहणे आणि गुड कोलेस्टेरॉल वाढणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. 
  • योगर्टमध्ये प्रथिनांचे प्रमाण  भरपूर असते. यामुळे भूक नियंत्रित होते. पर्यायाने वजन आटोक्यात राहाते.
  • -  शैलेंद्र कटके, ९९७०९९६२८२ (अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

    Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

    Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

    Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

    Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

    SCROLL FOR NEXT