Indian Cumin Agrowon
Image Story

सगळ्यांनाच हवाय विषमुक्त जिरा

जोधपूर येथील साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटरकडून विषमुक्त जिरा उत्पादनासाठी राजस्थानात एकात्मिक कीड व्यवस्थापन कार्यक्रम राबवला जात आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत एका वर्षात विषमुक्त जिऱ्याचे १५ ते १६ हजार टन उत्पादन घेतले जाते. या जिऱ्याला जगभरातील मसाला कंपन्यांची मागणी असते.

Devendra Shirurkar
jeera

मसाल्यातील अविभाज्य घटक असलेल्या जिऱ्याला जागतिक बाजारात मोठी मागणी असते. भारत हा जगातील प्रमुख जिरा उत्पादक देश असून जगातील ७० टक्के जिऱ्याचे उत्पादन भारतात घेतले जाते.

jeera

भारताखालोखाल सीरिया, तुर्की, अफगाण, सौदी अरब अमिराती या देशांतही जिऱ्याचे उत्पादन घेतले जाते. जगाच्या कानाकोपऱ्यात जिरा निर्यात करणाऱ्या भारताची निर्यात गेल्या काही महिन्यांपासून मंदावली आहे.

jeera

भारतीय जिऱ्याचा प्रमुख खरेदीदार आलेल्या चीनने मॅलेथीऑन, कार्बोसल्फान यांसारख्या ९ कीडनाशकांचे अवशेष असलेलया जिऱ्याची खरेदी थांबवल्याने निर्यातीत घट झाली आहे. याशिवाय अन्य खरेदीदार देशांनीही विषमुक्त (कीडनाशक अवशेषमुक्त) जिऱ्याची मागणी केली आहे.

jeera

भारत हा प्रमुख जिरा उत्पादक देश असून एकूण उत्पादनापैकी ५२ ते ५५ टक्के जिरा निर्यात करतो. गुजरात आणि राजस्थान हे भारतातील प्रमुख जिरा उत्पादक राज्य आहेत.

jeera

देशात विषमुक्त जिऱ्याच्या वाणाची वानवा आहे. बारमेर आणि जैसलमेर या राजस्थानातील शुष्क प्रदेशातच विषमुक्त जिरा पिकवला जातो. जोधपूर येथील साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटरकडून विषमुक्त जिरा उत्पादनासाठी राजस्थानात एकात्मिक कीड व्यवस्थापन कार्यक्रम राबवला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT