मनपाडळे (जि. कोल्हापूर) ः जल, मृदसंधारणाच्या कामामध्ये श्रमदान करताना गावातील महिला.
मनपाडळे (जि. कोल्हापूर) ः जल, मृदसंधारणाच्या कामामध्ये श्रमदान करताना गावातील महिला. 
ग्रामविकास

मनपाडळेच्या श्रमदानाला अनेकांचे हात

Raj Chougule

घुणकी, जि. कोल्हापूर :  मनपाडळे गावातील पाणीसमस्या सोडविण्यासाठी गावकरी एकवटले आहेत. विविध संस्था, घटकांच्या माध्यमातून आतापर्यंत ६५ हून अधिक नवीन बंधारे, १००हून अधिक चरांची खोदाई झाली आहे. १५ मेपासून मनपाडळेच्या डोंगरात साडेतीनशे एकरात जल, मृद संधारणाची कामे सुरू आहेत. लोकसहभागातून ४४० सलग समतल चर, ९० मातीचे बांध तयार करण्यात आले आहेत. गावाचे सुपुत्र आयएफएस अधिकारी संदीप सूर्यवंशी यांच्या पुढाकाराने जल, मृद संधारणाची चळवळ सुरू झाली. सूर्यवंशी यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून गावाला जलसंधारणातून स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प केला. त्यांच्या प्रेरणेने उपसरपंच रायबाराजे शिंदे, जयदीप सूर्यवंशी यांनी युवकांना संघटित करून जलसंधारणाच्या कामांचे नियोजन केले. गावकऱ्यांच्या बरोबरीने पंचायत समितीचे डॉ. प्रदीप पाटील, अशोकराव माने ग्रुपचे अध्यक्ष विजयसिंह माने, उद्योजक अनिल नानिवडेकर, राहुल माने यांनी जलमृद संधारणाच्या कामाला मदत केली आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील विविध संस्थांचे सदस्य गावकऱ्यांच्या साथीने श्रमदानात सहभागी झाले आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT