ग्रामपंचायतींमध्ये येणार ई-ग्रामसॉफ्ट प्रणाली
ग्रामपंचायतींमध्ये येणार ई-ग्रामसॉफ्ट प्रणाली 
ग्रामविकास

ग्रामपंचायतींमध्ये येणार ई-ग्रामसॉफ्ट प्रणाली

टीम अॅग्रोवन

जिल्हाभरातील १,१५१ ग्रामपंचायतींमध्ये पुढचा कारभार आता संगणकावर चालणार असून, त्या संदर्भात ई-ग्रामसॉफ्ट प्रणाली कार्यरत केली जाणार आहे. हे कामकाज १ मेपासून ऑनलाइन असणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने म्हटले  आहे.       ग्रामपंचायतीच्या कारभारासाठी  ई-ग्रामसॉफ्ट प्रणाली विकसित केली आहे. येत्या १ एप्रिलपासून ग्रामपंचायतींचे दफ्तर संगणकीकृत करण्याचे काम वेगाने सुरू होईल. आर्थिक व्यवहारांच्या नोंदी व इतर नोंदणी, आवक जावक याच्या नोंदी ऑनलाइनच असतील. ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना दिले जाणारे १ ते ३३ नमुने संगणकाद्वारे मिळतील. हे नमुने किंवा दाखले ग्राह्य धरले जातील. हस्तलिखित दाखले ग्राह्य धरले जाणार नाहीत. ग्रामपंचायतीचे जे दफ्तर उपलब्ध आहे, ते पूर्ण ऑनलाइन करावे लागेल. हे कामकाज १ मेपर्यंत पूर्ण करायचे आहे. दफ्तर पूर्णतः ऑनलाइन झाल्यानंतर दफ्तरची तपासणी करून ते सील केले जाईल. ग्रामपंचायतीमध्येच ते एका कपाटात ठेवले जाईल. पदाधिकारी व सदस्य यांच्या समक्ष त्यासंबंधीची कार्यवाही होईल. 

  ई - ग्रामसॉफ्ट प्रणालीचा फायदा   मालमत्ता करआकारणी, रहिवासी, वीजजोडणीसाठी ना हरकत, ना हरकत देय प्रमाणपत्र, शौचालय उपलब्धता, बांधकाम अनुमती, जन्म व मृत्यू नोंद, शासकीय योजनांचा लाभ, विवाह नोंदणी, दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती, नोकरी व व्यवसायासाठी ना हरकत, वय, कुटुंब प्रमाणपत्र, वर्तणूक, नळजोडणी अनुमती, बेरोजगार प्रमाणपत्र, मालमत्ता फेरफार आदी दाखले या प्रणालीतून मिळतील. यासाठी वीस रुपये शुल्क ग्रामस्थाला नियमानुसार द्यावे लागणार आहे. हे दाखले तातडीने दिले जावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT