शेततळ्यातील पाण्याचा वापर करुन उत्तम द्राक्षशेती
शेततळ्यातील पाण्याचा वापर करुन उत्तम द्राक्षशेती 
ग्रामविकास

डोंगरसोनी झाले १२६ शेततळ्यांचे गाव

Abhijeet Dake

शासकीय योजना बांधापर्यंत चांगल्या अर्थाने पोचली तर त्यातून परिवर्तन निश्चित होते. शासनाच्या मागेल त्याला शेततळे या योजनेचा लाभ कायम दुष्काळी डोंगरसोनी (जि. सांगली) गावातील शेतकऱ्यांनी घेतला. आजअखेर १२६ शेततळ्यांचे गाव म्हणून त्याची अोळख झाली आहे. द्राक्षासारखे नगदी पीक चांगल्याप्रकारे फुलवून कोरडवाहू शेतीत अर्थकारण उंचावणे त्यांना शक्य झाले आहे.

सांगली जिल्ह्यातील तासगाव हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीतही इथला शेतकरी कधीच हतबल झालेला नाही. तो कायम प्रयोगशील राहिलेला आहे. तालुक्‍याच्या पूर्व भागातील डोंगरसोनी (जि. सांगली) गाव डोंगरावर वसले आहे. गावात खातेदारांची संख्या १३६५ आहे. भौगोलिक क्षेत्र एक हजार ४३१ हेक्‍टर आहे. पैकी २६५ हेक्‍टर वन्य आहे. गावचे मंडल सावळज असून पर्जन्यमान सरासरी पाचशे मिलीमीटर आहे. मात्र, मंडलात कधीच सरासरीइतका पाऊस पडत नाही. त्यामुळे सतत पाणीटंचाई भासते. डोंगरावर असल्याने गावात कोणतेही उपसा सिंचन योजनेचे पाणी येत नाही.

पाणीटंचाईचे गाव डोंगरसोनी  

कोरडवाहू भाग असल्याने येथील शेतकऱ्याला आर्थिक सक्षम होण्यावर मर्यादा येतात. तासगाव तालुका मुळात द्राक्ष पट्टा म्हणून परिचित आहे. त्यामुळे या भागात अनेक शेतकरी द्राक्षतज्ज्ञ आहेत. मात्र पाणीटंचाई असल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक संकटे उभी राहिली. बागेला टॅंकरने पाणी देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्याचेही पाणी पुन्हा विहिरीतच साठवायचे. ही परिस्थिती बदलणे अत्यंत गरजेचे होते. डोंगरसोनीचा विचार करता संपूर्ण माळरान तिथं केवळ ज्वारी आणि बाजरी सोडून काही घेणे कठीण होते. गावात द्राक्षक्षेत्र वाढू लागल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण त्यावरच अवलंबून होते.

शेतकऱ्यांनी घेतली स्व खर्चातून शेततळी

पंचक्रोशीत सुरवातीला पाऊसकाळ चांगला होता. भूजलसाठाही उत्तम होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुपनलिका, विहिरी घेतल्या. त्यावर द्राक्ष बागा फुलू लागल्या. हळूहळू पावसाचे प्रमाण कमी झाले. भूगर्भातील पाणीसाठी कमी होऊ लागला. त्यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वखर्चाने व गरजेच्या आकारानुसार शेततळी घेण्याचा निर्णय घेतला. विहिरी आणि कुपनिलेकेतील पाणीउपसा करून ते शेततळ्यामध्ये साठवू लागले. आजची शेततळी  राष्ट्रीय कृषी विकास योजना ५२ राष्ट्रीय फळबाग विकास योजना ०४ शेततळे योजना १२६   द्राक्षक्षेत्रात झाली वाढ गावात २०१३-१४ मध्ये द्राक्षाचे चित्र सुमारे २३९ हेक्‍टर होते. मागेल त्याला शेततळे योजना शासनाने सुरू केली. त्यातून डोंगरसोनीतील शेतकरी जागृत झाले. गेल्या दोन वर्षांत शेततळ्यांची संख्या ज्या पद्धतीने वाढू लागली तसे द्राक्षाचे क्षेत्रही वाढू लागले. आजमितीस हे एकूण क्षेत्र ४६५ हेक्‍टर झाले आहे.  

प्रतिक्रिया : तासगाव तालुक्‍याचे भौगोलिक क्षेत्र सुमारे ७० हजार हेक्‍टर आहे. त्यापैकी ओलिताखालील क्षेत्र ४५ हजार हेक्‍टर असून द्राक्षाखाली ते सात हजार ९२० हेक्‍टर आहे. मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत तालुक्‍यात ९७२ शेततळी झाली आहेत. पैकी डोंगरसोनीत १२६ शेततळी असून, त्यातील ४० मध्ये आजमितीला पाणी आहे. शेततळी म्हणजे पाणी बॅंकच झाली आहे. आर. बी. शिंदे, तालुका कृषी अधिकारी, तासगाव, ९४२२४०६४९२   सौ. एस. व्ही. कुंभार, कृषी सहायक, डोंगरसोनी, ८२७५३८७९५२ शेतकऱ्यांचे अनुभव माझी २०१२ पासून द्राक्षबाग आहे. पाणीटंचाईमुळे कूपनलिका घेतली. मात्र, जमिनीतील पाण्याची पातळी खूपच खालावली आहे. उपलब्ध पाण्यावर एक एकर द्राक्षाला पाणी अपुरे पडत होते. केवळ शेततळे हाच पर्याय होता. आज तीन एकरांवर हे क्षेत्र वाढवले आहे. शेततळ्यामुळे माळरान फुलवले आहे. हणमंत श्‍यामराव झांबरे, ८८०६९१०८६३  केवळ कोरडवाहू शेती असल्याने आर्थिक समस्या कधीच सुटली नाही. मग द्राक्षशेती करण्याचा निर्णय घेतला. पण पाणीटंचाईमुळे ही शेती यशस्वी कशी करायची असा प्रश्‍न होता. गेल्यावर्षी शेततळे घेतले. दोन एकरांत द्राक्ष लागवड केली. पाणीटंचाई संपल्याने पुन्हा यंदा दोन एकर क्षेत्र वाढवले. अर्जुन झांबरे, ८८०६०८५६५६   पाच ते सहा वर्षांपासून द्राक्ष पीक घेतोय. हळूहळू द्राक्ष बागेचे क्षेत्र वाढले. तशी पाणीटंचाई जाणवू लागली. त्यामुळे स्वखर्चाने शेततळे घेण्याचा निर्णय घेतला आणि पाणीटंचाईवर मात केली. रघुनाथ झांबरे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT