केळी पीक सल्ला
केळी पीक सल्ला 
फळबाग

केळी पीक सल्ला

आर. व्ही. देशमुख, डॉ. एस. व्ही. धुतराज

सध्या तापमानात वाढ होऊन थंडीचा कडाका कमी होत आहे. तापमानात वाढ होत असल्यामुळे येथून पुढे केळीची वाढ जोमाने होण्यास सुरवात होईल. मृगबाग लागवडीची केळी सध्या निसवणीच्या अवस्थेत आहे. त्यामुळे केळी बागेची काळजी घेणे आवश्यक आहे.

मृगबाग लागवड:

  • केळीच्या झाडालगतचे गवत काढून बाग ताणविरहित ठेवावी. बागेत पिवळी, तसेच रोगग्रस्त पाने कापून त्याची बागेबाहेर विल्हेवाट लावावी. झाडालगतची पिले धारदार विळ्याने नियमित कापून त्यांची बागेबाहेर विल्हेवाट लावावी.
  • विद्राव्य खते ठिबकद्वारे द्यावयाची झाल्यास ०:५२:३४ हे व्रिदाव्य खत एकरी ५० किलो (रोज ०.५ किलो) याप्रमाणे व ०:०:५० एकरी ५० किलो (रोज ०.५ किलो) याप्रमाणे १४७ ते २४७ दिवसांदरम्यान द्यावे. सोबत कॅल्शिअम नायट्रेट १० किलो ५-५ किलो दोन वेळेस विभागून द्यावे.
  • केळी बागेमध्ये ठिबक संच बसवला नसेल तर लागवडीनंतर १६५ दिवसांनी युरिया ८२ ग्रॅम व म्युरेट ऑफ पोटॅश ८३ ग्रॅम प्रतिझाड या प्रमाणात रासायनिक खताची मात्रा द्यावी. खते झाडापासून १५ सेमी अंतरावर बांगडी पद्धतीने द्यावी आणि लगेच मातीने झाकावी.
  • ठिबक संचाची नियमित तपासणी करून बागेस ९ ते १० लिटर पाणी प्रतिझाड प्रतिदिवस ठिबकद्वारे शक्यतो रात्रीच्या वेळेस द्यावे.
  • बागेच्या चोहोबाजूस सजीव कुंपणाची लागवड केली नसल्यास उंच वाढणारी मका अथवा ज्वारीची चारी बाजूंनी दोन ओळीत दाट लागवड करावी जेणेकरून उन्हाळ्यातील उष्ण वाऱ्यापासून बागेचे संरक्षण होईल.
  • कांदेबाग लागवड:

  • कांदेबाग लागवडीची केळी सध्या रोपांच्या तारुण्य अवस्थेमध्ये आहे. कांदेबागेचे विशेष करून थंडीपासून संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे.
  • बागेमध्ये उभी-आडवी वखर पाळी देऊन झाडाभोवतालचे गवत मजुरांच्या साह्याने खुरपणी करून बाग तणमुक्त ठेवावी.
  • बागेस ठिबकद्वारे विद्राव्य खते द्यावयाची झाल्यास १९:१९:१९ हे खत ७५ किलो (रोज १ किलो) व युरिया १५० किलो (रोज २ किलो) प्रतिएकर याप्रमाणे ७१ ते १४६ दिवसांदरम्यान द्यावे.
  • केळीची लागवड केलेल्या चारही बाजूकडील बांधावरील वेलवर्गीय तणे उपटून नष्ट करावेत. बागेत विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही.  
  • नांग्या असल्यास त्या ठिकाणी सारख्या जातीच्या कंदाची लागवड करून नांग्या भरून घ्याव्यात.
  • ७५ दिवसांनी द्यावयाचा नत्राचा हप्ता ८२ ग्रॅम युरिया प्रतिझाड याप्रमाणे द्यावा. फेब्रुवारीच्या पाहिल्या पंधरवाड्यामध्ये रामबाग लागवडीचे नियोजन करावे.
  • पीक संरक्षण

  •  मृगबागेत करपा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारणी प्रतिलिटर पाणी प्रोपीकोनॅझाॅल (२५ ईसी) १ मिली + १ मिली उत्तम प्रतीचे स्टीकर
  • दुसरी फवारणी १० दिवसाच्या अंतराने कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम  परिणामकारक फवारणीसाठी नॅपसॅक फवारणी यंत्राचा वापर करावा.
  •  कांदेबागेमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) १०० ग्रॅम १०० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणाची २०० मिली प्रतिझाड या प्रमाणे संपूर्ण बागेला आळवणी करावी.
  • संपर्क  ः ०२४६२ - २५७३८८ (केळी संशोधन केंद्र, नांदेड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

    Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

    Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

    Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

    Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

    SCROLL FOR NEXT