जवसापासून जेल, कुरकुरीत पदार्थ
जवसापासून जेल, कुरकुरीत पदार्थ 
औषधी वनस्पती

जवसापासून जेल, कुरकुरीत पदार्थ

डॉ. आर. टी. पाटील

विविध आजारांवरील उपचारामध्ये जवस उपयुक्त असूनही त्याचा आहारातील वापराबाबत फारशी जागरुकता दिसत नाही. यातील ओमेगा ३ या मेदाम्लांमुळे दैनंदिन आहारामध्ये समावेशाची शिफारस जगभरातील आहारतज्ज्ञ करतात. विशेषतः मत्स्याहारी नसलेल्या लोकांसाठी जवस हे ओमेगा ३ मेदाम्लाचा महत्त्वाचा स्त्रोत ठरू शकते. आपल्याकडे जवसापासून प्रामुख्याने बी, पीठ आणि खाण्यायोग्य तेल यांचे उत्पादन घेतले जाते. मात्र, आहारामध्ये वापर वाढवण्यासाठी जवसाच्या बियांचा वापर तयार खाद्यपदार्थ, सॅलड, पाव यामध्ये करणे गरजेचे आहे. जवसाचे बी हे अल्फो लिओनिक आम्ल, लिग्निन, उच्च दर्जाचे प्रथिने, विद्राव्य तंतुमय पदार्थ आणि फिनोलिक संयुगांचे स्त्रोत आहे. जवसामध्ये लिपीडचे प्रमाण ३७ ते ४५ ग्रॅम प्रति १०० ग्रॅम असते. बी च्या बाह्य आवरणात ७५ टक्के तेल असून, तेलामध्ये ९८ टक्के ट्रॉयॲसिलग्लिसरोल, फॉस्फोलिपीड आणि मेदाम्लाचे प्रमाण ०.१ टक्के असते. बाह्य आवरणात सरासरी २१ टक्के प्रथिने असून, या प्रथिनांमध्ये अर्गिनाइन, ॲस्पार्टिक आम्ल आणि ग्लुटेमिक आम्लाचे प्रमाण जास्त असते. जवसातील काही घटक कर्करोग, रक्तातील शर्करा आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. जवसाचा आहारात वापर करण्यापूर्वी...

  • जवसाचे सेवन गर्भवती महिलांनी करू नये.
  • काही लोकांना जवस बी आणि तेल यांची ॲलर्जी असू शकते.
  • पूर्ण पक्व न झालेल्या जवसाचा वापर करू नये.
  • जवसाचा वापर अतिरिक्त प्रमाणात आणि कमी पाण्यासोबत केल्यास आतड्याला सूज येणे, पोटातील गॅस आणि अतिसार यासारखे त्रास होऊ शकतात.
  • जवसाचे जेल ः केस आणि त्वचेसाठी जवसाचे जेल फायदेशीर आहे. घरगुती स्तरावर त्वचा आणि केसांची निगा राखण्यासाठी बनविल्या जाणाऱ्या उत्पादनामध्ये त्याचा वापर करतात. बनविण्याची पद्धत ः एका भांड्यामध्ये पाणी आणि जवस घ्यावे. मंद आचेवर पाणी आणि जवसाचे मिश्रण ठेवावे. हे पाणी चिकट आणि जेलसारखे झाल्यानंतर आच देणे बंद करावे. हे तयार झालेले जेल थंड होऊ द्यावे. हे जेल एका हवाबंद बाटलीत भरणीत भरून थंड आणि कोरड्या जागी ठेवून द्यावे. वापरण्याची पद्धत ः

  • केसांवर लेप देऊन सुमारे २ तासाने धुवावे. अनेकवेळा शॅम्पूने केस धुतल्यानंतर याचा कंडिशनरप्रमाणेही वापर केला जातो. यामुळे केस मऊ, चमकदार आणि रेशमी दिसतात.
  • या जेलचा वापर चेहरा व शरीरावर मालिशसाठीही करता होतो. तसेच भुवयांच्या वाढीसाठीदेखील हे जेल उपयुक्त मानले जाते.
  • फायदे ः

  • जेलमध्ये मेगा ३ मेदाम्लाचे प्रमाण जास्त असते. केसांच्या मुळांना जेलमुळे पोषण मिळून त्यांची वाढ अधिक जलद आणि दाट होते. तसेच केस अधिक चमकदार आणि मजबूत होऊन गळण्याचे प्रमाण कमी होते.
  • त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे, मुरुम, डोक्यातील कोंडा कमी करण्यास उपयुक्त.
  • त्वचा मऊ होते. वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करते.
  • रोस्टेड जवस साहित्य ः १ कप जवस पावडर, ३ चमचे ऑलिव तेल, पाव कप (सफरचंद सिडार) व्हिनेगर, १ ते २ चमचे पाणी, अर्धा चमचा मीठ. कृती ः

  • एका भांड्यात वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. तयार मिश्रण एकजीव होण्यासाठी २० मिनिटे ठेवावे.
  • मिश्रण १५० ते १६० अंश सेल्सिअस तापमानात गरम करून घ्यावे.
  • सर्व मिश्रण बोथट चमच्याने न चिटकणाऱ्या कागदावर (पार्चमेंट पेपर) काढावे. त्या कागदानेच वरील व खालील बाजूने झाकून घ्यावे. सपाट आणि चौकोनी आकार येण्यासाठी लाटण्याने त्यावर दाब द्यावा.
  • वरील कागदाचा तुकडा काढून, खालील कागदासह मिश्रण तव्यावर ठेवावे.
  • त्याला ओव्हनमध्ये ४० ते ४५ मिनिटे त्याचा मध्यभाग चांगला घट्ट होईपर्यंत उष्णता द्यावी. त्यानंतर मिश्रण ओव्हनमधून बाहेर काढून सामान्य तापमानाला थंड होऊ द्यावे.
  • पेपरवरील कुरकुरीत रोस्टेड जवस कापण्याच्या बोर्डवर घेऊन योग्य आकारामध्ये तुकडे करावेत.
  • कुरकुरीतपणामुळे लहान मुलेही आवडीने खातात.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Unseasonal Rain : पूर्व विदर्भाला वादळी वाऱ्यासह पावसाचा दणका

    Weather Update : विदर्भात गारपीट, वादळी पावसाचा इशारा

    Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

    Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

    Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

    SCROLL FOR NEXT