health benefits of kokam
health benefits of kokam 
औषधी वनस्पती

गुणकारी कोकम

पल्लवी कांबळे, चंद्रकला सोनवणे

कोकम सरबतामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. त्वचा निरोगी राहण्यासाठी कोकम खूप उपयोगी आहेत. आहारात कोकमाचा नियमित वापर केल्यास पोट साफ राहण्यास मदत होते. कोकमामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, तंतूमय पदार्थ व क जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते. कोकम सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदानुसार कोकम ही अत्यंत उपयोगी वनस्पती आहे. कोकम सरबतामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. त्वचा निरोगी राहण्यासाठी कोकम खूप उपयोगी आहेत. आहारात कोकमाचा नियमित वापर केल्यास पोट साफ राहण्यास मदत होते. कोकमामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, तंतूमय पदार्थ व क जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार कोकम हे रक्तपित्तशामक, दीपक, पाचक व ग्राही गुणधर्माचे आहे. कोकमचा वापर अन्नपदार्थ साठविण्यासाठी आणि आंबटपणा आणण्यासाठी केला जातो. कोकमापासून अमसूल, कोकम आगळ (मिठाचा वापर करून साठवलेला रस) आणि कोकम सरबत तयार केला जातो. कोकमाच्या बियांमधील तेलास कोकम बटर असे म्हणतात. कोकम बटरचा उपयोग सौंदर्य प्रसाधने, औषधे किंवा मलमांमध्ये केला जातो.

  • मराठी नाव - आमसूल,
  • संस्कृत नाव - साराम्ल
  • इंग्रजी नाव - कोकम
  • शास्त्रीय नाव - गार्सिनिया इंडिका
  • कुळ - गटिफेरी
  • औषधी उपयोग

  • चरकाचार्याच्या मते चिंचेपेक्षा कोकम हे जास्त औषधी गुणधर्मयुक्त व शरीरास गुणकारी आहे.
  • कोकम पाण्यात टाकून त्याचा काढा करून प्यायल्यास अपचन दूर होते.
  • कोकमामध्ये पाणी घालून त्याचा गर बनवावा. हा गर पाण्यात टाकून त्यात वेलची, खडीसाखर घालून सरबत बनवावे. हे सरबत प्यायल्याने आम्लपित्त, दाह, तृष्णा, उष्णतेचे विकार दूर होतात.
  • कोकमचा गर, नारळाचे दूध, कोथिंबीर व थोडे ताक एकत्र करून त्याची सोलकढी बनवून जेवणासोबत प्यावी. यामुळे घेतलेल्या अन्नांचे पचन व्यवस्थित होते.
  • अतिसार, संग्रहणी आणि रक्ताचे जुलाब हे पोटात मुरडा येऊन होत असतील तर कोकम कुसकरून गाळलेले पाणी प्यावे.
  • अंगावर पित्त उठले असल्यास कोकमचा गर संपूर्ण अंगास लावावा.
  • पोटात कळ येऊन आव पडत असल्यास कोकमचे तेल भातावर घालून तो भात खावा.
  • हातापायांची उष्णतेमुळे आग होत असेल तर कोकमचे तेल संपूर्ण अंगाला चोळावे. यामुळे उष्णता कमी होऊन दाह कमी होतो.
  • हिवाळ्यात थंडीमुळे ओठ फुटणे किंवा त्वचा कोरडी पडून भेगा पडणे यासाठी कोकमचे तेल कोमट करून लावावे.
  • आहारामध्ये कोकमचा नियमितपणे वापर केल्यास अरुची, आम्लपित्त, भूक मंद होणे, अपचन इ. तक्रारी दूर होऊन आहाराचे पचन चांगले होते.
  • कोकम (१० तोळे ) पाण्यात भिजत घालावे. नंतर ते कोकम पाण्यात कुसकरून ते पाणी गाळून घ्यावे. त्यात जिरेपूड, साखर घालून ते पाणी प्यायले असता शरीरावर आलेले शीतपित्त दूर होते.
  • मूळव्याधीचा त्रास होत असेल व रक्त पडत असल्यास कोकमचा गर दह्यावरच्या निवळीत कालवून ती निवळी प्यावी. यामुळे रक्त पडणे बंद होते.
  • कोकमच्या सालीपासून अमसूल तयार केले जाते. रोजच्या जेवणात तसेच सोलकढी तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो.
  • अमृत कोकम (सिरप) या पेयाच्या सेवनाने शरीराला थंडावा मिळतो. अमृत कोकम बनविण्यासाठी ताज्या कोकम फळांच्या सालीचा वापर करतात.
  • संपर्क-  प्रा. पल्लवी कांबळे, ८३२९३७५३९० (आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, बीड.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Rain : उन्हाचा चटका असह्य; राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज कायम

    Water Scarcity : भूजल पातळीत घट; ३४ गावांत हातपंप बंद

    Agriculture Irrigation : निळवंडेचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको ः आमदार तनपुरे

    Crop Loan : जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

    Canal Work : गोसेखुर्द कालव्याचे काम रखडले

    SCROLL FOR NEXT