health benefits of asafoetida
health benefits of asafoetida 
औषधी वनस्पती

आरोग्यदायी हिंग

डॉ. विनीता कुलकर्णी

आपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी हिंग तर लागतोच. त्यामुळे प्रत्येक घरी हिंगपूड असते. पदार्थाची रुची वाढविण्यासाठी, खमंगपणा येण्यासाठी हिंग उपयोगी पडतो. औषध म्हणूनही हिंग तेवढाच उपयोगी आहे. त्याचे औषधी गुणधर्म माहिती असले म्हणजे त्यादृष्टीने त्याचा उपयोग करता येतो.

  • हिंग अत्यंत पाचक म्हणून काम करतो. जेवणामध्ये गोड ताजे ताक आणि त्यात हिंग घालून घेतल्यास पचन सुधारते.
  • हिंगाचा समावेश असणारे हिंगाष्टक चूर्ण भूक वाढवते, पोटातले गॅसेस कमी करते; पण घेण्याची पद्धत मात्र जाणून घेतली पाहिजे. जर भूक लागत नसेल तर जेवणात पहिल्या घासाबरोबर हिंग्वाष्टक चूर्ण तुपासह घ्यावे. जर पोट दुखत असेल तर जेवणानंतर हिंग्वाष्टक चूर्ण पाव चमचा प्रमाणात गरम पाण्यातून घ्यावे.
  • पोटात खूप दुखत असेल आणि गॅसेसमुळे दुखत असेल तर हिंगाचा गरम लेप पोटावर नाभीभोवती लावावा. त्यासाठी हिंग पाण्यात कालवून गरम करावा. आधी पोटावर तेल गोलाकार लावावे. नंतर हिंगाचा लेप लावावा. वाळला की काढून टाकावा. शिवाय पोट शेकावे. आराम मिळेल. हा उपाय तान्ह्या बाळालाही उपयोगी ठरतो.
  • हिंग, जिरे, सैंधव यांचे चूर्ण पाव चमचा प्रमाणात तुपासह चाटण घेतले तर पचन सुधारून भूक लागते.
  • श्‍वासाचा त्रास, कफाचा खोकला यात अतिप्रमाणात त्रास वाताच्या दृष्टीमुळे होतो. विशेषतः दमा असताना उशिरा जेवण, जड जेवण यामुळे गॅसेसचा त्रास होऊन श्‍वास लागतो. कफाच्या जोडीला हे कारणही विचारात घ्यावे लागते. अशा वेळी दमा, खोकला असताना रात्रीचे जेवण लवकर घ्यावे. हिंग्वाष्टक चूर्ण ज्यात हिंग समाविष्ट असतो ते तुपासह योजावे. शिवाय कफ कमी करणारी औषधे पण द्यावीत. पाचक आणि कफ करणारी औषधे दमा असताना योजली तर उपयोग अधिक चांगला होतो.
  • पथ्य जड अन्न (पचण्यास जड), एकाच वेळी भरपूर खाणे, रात्री उशिरा जेवण टाळावे, दही, आंबट ताक, लस्सी, काकडी, शिकरण केळी हे पदार्थ कफ करणारे असल्याने टाळावेत. काळजी

  • भूक न लागणे, निरुत्साह, थकवा, मळमळणे अशी लक्षणे वारंवार निर्माण होत असतील तर रक्त तपासणी, काविळीसाठीची तपासणी, सोनोग्राफी जरूर करून घ्यावी.
  • कफ खूप असेल, श्‍वासाला त्रास होत असेल, ताप असेल तर एक्‍स-रे, रक्त तपासणी जरूर करावी.
  • आपल्या रोजच्या वापरातील हिंग औषध म्हणून वापरला तर निश्‍चितच लहानसहान तक्रारींना आराम पडू शकतो.
  • संपर्क - डॉ. विनीता कुलकर्णी, ९४२२३१०३७७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT