FMD Vaccination Agrowon
ॲनिमल केअर

FMD Vaccination : लाळ्या खुरकूत लसीकरण मोहिमेची प्रतीक्षा

सांगली ः जिल्ह्यातील गोवर्गीय पशुधनाचे शंभर टक्के लसीकरण झाल्यानंतरही लम्पी स्कीन या त्वचा आजाराचा फैलाव वाढत आहे. त्यातच आता जनावरांना लाळ्या खुरकूतची लागण होण्याची भीती निर्माण झाली असल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

टीम ॲग्रोवन

सांगली ः जिल्ह्यातील गोवर्गीय पशुधनाचे (Livestock) शंभर टक्के लसीकरण (FMD Vaccination) झाल्यानंतरही लम्पी स्कीन (Lumpy Skin) या त्वचा आजाराचा फैलाव वाढत आहे. त्यातच आता जनावरांना लाळ्या खुरकूतची लागण होण्याची भीती निर्माण झाली असल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात अद्याप लाळ्या खुरकूतच्या लसीकरणाची मोहीम पशुसंवर्धन विभागाने हाती घेतली नाही. त्यामुळे लसीकरण कधी सुरू करणार, असा सवाल पशुपालक करीत आहेत. जिल्ह्यात पशुधनाची संख्या ११ लाख ०३ हजार ५९३ आहे.

सध्या जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या आजाराचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने शंभर टक्के लसीकरण केले आहे; मात्र लाळ्या खुरकूत आजाराचे लसीकरण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने कोणत्याही हालचाली सुरू केल्या नसल्याचे चित्र आहे.

अगोदरच लम्पी स्कीन आजारामुळे जनावरे दगावली आहेत. लाळ्या खुरकूत हा आजार संसर्गजन्य आहे. दोन खुर असणाऱ्या गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळ्या-मेंढ्या अशा जनावरांमध्ये या आजाराची लागण होते. नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये थंडीच्या वातावरणात या आजाराची जनावरांना लागण होण्याची जास्त शक्‍यता असते.

त्यामुळे लाळ्या खुरकूतचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. पशुसंवर्धन विभागाकडे पन्नास ते साठ हजार लाळ्या खुरकूतच्या लस मात्रा उपलब्ध आहेत. परंतु लसी शिल्लक असल्या तरी लसीकरणासाठी शासनाचे निर्देश नाहीत, असे सांगण्यात येत आहे. या आजारामुळे जनावरांचा मृत्यू झाल्यानंतर विभागाला जाग येणार का, असा प्रश्न पशुपालक उपस्थित करू लागले आहेत.

लाळ्या खुरकूतच्या ५० हजार लस मात्रा उपलब्ध आहेत. वरिष्ठांकडून निर्देश आल्यानंतर लसीकरणाची मोहीम सुरू होईल.
डॉ. सदाशिव बेडक्याळे, सहायक उपायुक्त पशुसंवर्धन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

Solapur DCC Bank: ‘डीसीसी’ने ओलांडला दहा हजार कोटींचा टप्पा

Onion Harvesting: कांदा वाचवण्यासाठी शेतशिवारात लगबग

Dharashiv Agriculture Loss: ऐन सुगीत ‘पूर्वमोसमी’चे धुमशान

SCROLL FOR NEXT