डिसबडिंग (disbudding) म्हणजे लहान वयातच वासराची शिंगे काढून टाकणे. डिसबडिंगमध्ये सुरवातीलाच शिंगांच्या वाढीस अटकाव केला जातो. जेव्हा शिंगाचा मूळ कळीच्या अवस्थेत असतो. शिंगांचे दूध उत्पादनात (milk production) काहीच महत्व नसते. रासायनिक प्रक्रिया करून वासराची शिंगे लहानपणीच काढावीत, यालाच शिंगे खुडणे असे म्हणतात.
- वासराचे वय एक आठवडा असतानाच त्याची शिंगे काढून टाकली जातात.
- शिंगे वाढीच्या सुरुवातीला काढल्यामुळे ती योग्य प्रकारे काढली जाऊन शिंगाची वाढ करणाऱ्या पेशी नष्ट केल्या जातात.
- शिंगाचे मूळ कापालयुक्त कवटी पासून मुक्त होते व ते सहजपणे काढले जाऊ शकते.
- लाल तापलेल्या लोखंडाचा वापर करून शिंगे काढल्यास, अँटिसेप्टिक क्रीम लावावी.
- शिंगे जास्त किटक असणाऱ्या हंगामात काढली तर जखमेवर फ्लाय रीपेलन्ट लावावे.
- गायीच्या वासराचे वय १० ते १५ दिवसात तर म्हशीच्या रेडकाचे ७ ते १० दिवस असताना डिसबडिंग केले पाहिजे.
फायदे-
- शिंगे कापलेल्या जनावरांना गोठ्यामध्ये कमी जागेची आवश्यकता असते.
- डिसबडिंगमुळे जनावरांना शिंगाचा कर्करोग होत नाही.
- शिंगे नसलेल्या जनावरांची निगा राखणे सोप्पे जाते.
- शिंगे असलेले प्राणी एकमेकांना मारून जखमा करण्याची शक्यता असते.
- शिंगे नसलेले प्राणी अधिक सहजपणे हाताळता येतात.
- शिंगे नसल्यामुळे जनावरे विकताना शिंगावरून भेदभाव केला जात नाही.
- म्हशीमध्ये बऱ्याचदा शिंगे आतील बाजुस वाढल्याने जखम होण्याची शक्यता असते.
तोटे
- शिंगे काढल्यामुळे शिंगावरून जनारांचे वय ओळखण्यात अडचण येते.
- प्रदर्शनासाठी बऱ्याचदा जनावरांची शिंगे रंगवून आकर्षक ठेवतात, त्यात कायमस्वरुपी बाधा येते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.