Structure of Goat Farm
Structure of Goat Farm 
कृषी पूरक

शेळ्यांचा गोठा कसा असावा?

टीम अॅग्रोवन

हिवाळा हा ऋतु आरोग्यास पोषक असल्यानं व्यवसाय सुरु करताना या कालावधीत केल्यास फायद्याचे ठरते. शेळ्यांची  निवड करताना किंवा व्यवसाय सुरू करताना शक्यतो हिवाळ्यात सुरू करावा कारण हिवाळा ऋतू हा आरोग्यासाठी पोषक मानला जातो. शेळ्या, मेंढ्यांना पुरेसा आहार द्यावा. आजारी शेळ्यांचे स्वतंत्र व्यवस्थापन ठेवावे.

कोणत्याही व्यवसायामध्ये संगोपन व व्यवस्थापन याला फार महत्त्व आहे. शेळ्यांना होणारे रोग, त्याची लक्षणे तसेच उपचार व प्रतिबंधात्मक उपाय माहिती असल्यास मरतुकीवर नियंत्रण ठेवता येते. हिवाळा हा ऋतू प्रजननाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. शेळीची निवड करताना किंवा व्यवसाय सुरू करताना शक्यतो तो हिवाळ्यात सुरू करावा.

शेळ्यांच्या गोठ्याची रचना-

  • गोठ्याची रचना ही इंग्रजी A अक्षरासारखी असावी.
  • शेळ्या आणि मेंढ्यांना फार खर्चिक गोठ्याची आवश्यकता नसते.
  • गोठे थोड्या उंचावर बांधणे आवश्यक असते. गोठे कोरडे, हवेशीर असावेत. 
  • हिवाळ्यात सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण कमी असल्यामुळे गोठ्यामध्ये ओलावा जास्त काळ टिकून राहून तापमान कमी होते.
  • गोठ्याची दिशा ठरवताना दक्षिण-उत्तर अथवा पूर्व-पश्‍चिम बाजूने ठेवल्यास सकाळी आणि सायंकाळी कोवळ्या सूर्यकिरणांमुळे गोठ्यातील ओलसरपणा कमी होतो.
  • गोठा कोरडा व स्वच्छ ठेवावा. गोठ्यातील जमिनीत चुनखडी किंवा मुरमाचा वापर केल्यास ओलसरपणा कमी होतो आणि जमिनीचे तापमान कमी करण्यास प्रतिबंध करता येतो. 
  • गोठ्यांच्या आजूबाजूला मोकळी जागा असावी. गोठ्याच्या दोन्ही बाजूंस जागा ठेवून कुंपण करावे. स्वच्छ पाण्याची सोय करावी. 
  • कोणत्याही भौगोलिक भागात व्यवसाय सुरु करण्याआधी तेथील स्थानिक जातींना प्राधान्यक्रम द्यावे. नव्याने निर्मिती झालेल्या जाती वातावरणाशी समरस होण्याची शक्यता कमी असल्याने, त्या वारंवार आजाराला बळी पडतात. परिणामी या शेळ्यांच्या आहारावर, ओषध-उपचारांवर जास्त खर्च होतो. या सर्व गोष्टी विचारात घेऊन शेळी पैदास धोरण ठरविताना स्थानिक शेळ्यांच्या जातीला प्रथम प्राधान्य द्यावं. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT