Salam Kisan Agrowon
कृषी पूरक

Hydroponics Fodder Production : हायड्रोपोनिक्स चारा कसा तयार करावा?

Hydroponics Fodder : चाराटंचाईच्या काळात हिरवा चारा व पशुखाद्य देणे व्यावसायिक व आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. अशा परिस्थितीत उत्तम व्यवस्थापन करून कमी दिवसात, कमी वेळेत, कमी पाण्यावर, कमी जागेत हायड्रोपोनिक्स चारा चांगला पर्याय आहे.

Team Agrowon

Hydroponics Fodder Farming System : चाराटंचाईच्या काळात हिरवा चारा व पशुखाद्य देणे व्यावसायिक व आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. अशा परिस्थितीत उत्तम व्यवस्थापन करून कमी दिवसात, कमी वेळेत, कमी पाण्यावर, कमी जागेत हायड्रोपोनिक्स चारा चांगला पर्याय आहे. हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन तंत्राचा वापर केल्याने वर्षभर हिरवा चारा उत्पादन शक्य आहे.

कमी जागेत, कमी पाण्यात, कमी कालावधीत चारा उपलब्ध होतो. उन्हाळ्यातदेखील हिरव्या चाऱ्याची उपलब्धता होते. तयार झालेला चारा मुळासकट जनावरांना खाऊ घालता येत असल्यामुळे बहुतांश पाणी व जास्तीत जास्त अन्नद्रव्ये जनावरांना मिळतात. चारा चवदार असतो. प्रथिने, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जीवनसत्त्वाचे प्रमाण भरपूर असतात.

हायड्रोपोनिक्स  चारा उत्पादनाचे तंत्र 

- हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामध्ये ट्रेचा वापर आवश्यक आहे. चारानिर्मितीसाठी चांगल्या प्रतीचे मका बियाणे निवडावे. बियाण्याची उगवणक्षमता चांगली असावी.

- दोन लिटर कोमट पाण्यात एक किलो मका दिवसभर भिजत ठेवावा. त्यानंतर भिजविलेल्या मक्यातून पाणी निथळून गेल्यानंतर बियाणे ओल्या गोणपाटात गुंडाळून ठेवावे. यामुळे बियाणांची उगवण चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते.

- गोणपाटावर सकाळ, संध्याकाळी पाणी शिंपडून सतत ओलसर ठेवावे. अशा पद्धतीने मका बियाणास सुमारे दोन दिवसांनंतर मोड फुटतात. मोड आलेले बियाणे ट्रे मध्ये पसरावे. ट्रे चा आकार तीन फूट लांब, दोन फूट रुंद आणि तीन इंच उंच असावा.

- प्रत्येक ट्रे साठी एक किलो मका लागतो. आपल्याकडील जनावराच्या संख्येनुसार ट्रे ची संख्या ठरवावी. लाकडी पट्या किंवा बांबूच्या फ्रेमवर ट्रे ठेवावेत.  

- ट्रे वर दिवसातून ४ ते ५ वेळेस झारीने पाणी फवारावे. एका ट्रे ला दोन लिटर पेक्षा जास्त पाणी लागत नाही. पंधरा दिवसांत चारा तयार होईपर्यंत प्रति ट्रे साठी तीस लिटर पाण्याची गरज असते.

- सुमारे १२ ते १५ दिवसांमध्ये मका चारा साधारणपणे एक फुटांपर्यंत वाढतो. एक किलो बियाण्यापासून सुमारे १० ते १२ किलो चारा तयार होतो.

गाई,म्हशींसाठी  फायदे 

दूध व फॅट प्रमाणात वाढ.

पचन क्रिया सुधारते, आरोग्य चांगले राहाते.  

क्षार मिश्रण, पशू खाद्यामध्ये बचत. 

दुभती जनावरास प्रती दिन १०-१२ किलो आणि भाकड जनावरे ६-८ किलो द्यावे.

------------

 स्त्रोत - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

(An initiative by Salam Kisan.) 

(सलाम किसान हे सुपर अॅप असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सेवा व उत्पादने उपलब्ध करून दिली जातात.) 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation System: शेडनेट हाउसमधील ठिबक सिंचन प्रणाली

Fuel Price Hike: इंधन दरवाढीमुळे शेती मशागतीचे दर वाढले

Rural Employment Scheme: १२५ दिवस हक्काचे काम; मजुरांना 'स्मार्ट जॉब कार्ड', १ जुलैपासून 'व्हीबी-जी राम जी' योजना लागू

Post Harvest Management: फळ काढणीनंतर करावयाची कामे

Avakali Paus Madat: मार्चमधील नुकसानीसाठी ६ कोटी ८२ लाखांच्या मदतीला मंजुरी

SCROLL FOR NEXT