वेळीच रोखा दुधाळ जनावरांतील कासदाह अाजार
वेळीच रोखा दुधाळ जनावरांतील कासदाह अाजार 
कृषी पूरक

वेळीच रोखा दुधाळ जनावरांतील कासदाह अाजार

कुलदीप शिंदे

कासदाह हा अाजार दुधाळ जनावरांतील कासेचा प्रमुख अाजार आहे. ज्या ज्या भागांमध्ये दुध उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते अशा ठिकाणी या रोगापासून होणारे नुकसान देखील अतिशय मोठ्या प्रमाणावर असते. हा रोग पहिल्या वेतातील जनावरांमध्ये या अाजाराचे प्रमाण ५ टक्के अाहे. तर अधिक वेत देणाऱ्या जनावरांमध्ये हेच प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत अाहे.   कासदाह कासदाह म्हणजे "कासेला येणारी सूज'' तर वैज्ञानिक दृष्ट्या पाहिले तर कासदाह म्हणजे भौतिक, रासायनिक आणि जैविक कारणांमुळे कासेवर सूज येणे आणि त्याचबरोबर गाई व म्हशी दूध देण्याचे पूर्ण थांबणे किंवा दूध उत्पादन कमी होणे.

हा अाजार फक्त कासेवरील येणाऱ्या सुजेशी मर्यादित नसून जनावराला तात्पुरत्या स्वरुपात अनुत्पादक बनवतो आणि जर वेळेवर उपचार केले नाहीत तर जनावरे कामयचे अनुत्पादक बनतात. त्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते. या अाजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अावश्यक अाहे. त्यासाठी गोठ्याचे योग्य व्यवस्थापन ठेवावे.  

अाजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना

गोठ्याची स्वच्छता जनावरांचा गोठा अाणि आसपासचा परिसर जंतुनाशकाने वेळोवेळी स्वच्छ करावा. शेण साठविण्याकरता केलेला खड्डा हा गोठ्यापासून ५० मीटर अंतरावर असावा. एखाद्या  जनावराला इतर जनावरांपासून वेगळे ठेवावे. त्या जनावराचे दूध सर्वात शेवटी काढावे.  

जनावरांची स्वच्छता जनावरांना दररोज स्वच्छ केल्याने किंवा धुतल्याने अंगावर जमा होणारी धुळ आणि शेण काढले जाते. त्यामुळे स्वच्छ दुध उत्पादन होते. योग्य प्रमाणात रक्त पुरवठा होतो. दुध काढण्यापूर्वी जनावराची कास स्वच्छ पाण्याने धुऊन स्वच्छ कापडाने पुसावी. कास धुण्यासाठी पोटॅशियम परमॅंगनेटचा वापर करावा.

धार काढणारी व्यक्ती जनावरांना दूध काढणाऱ्या व्यक्तीपासून संसर्गजन्य रोगाचा धोका असतो. धार करणाऱ्या व्यक्तीने दूध काढण्यापूर्वी आणि काढल्यानंतर तसेच प्रत्येक जनावराची धार काढल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. नखे नियमित काढावीत. त्याच्यामुळे सडाला इजा होण्याची शक्‍यता असते. धार काढताना खोकने किंवा थुंकणे असे प्रकार टाळावेत.

दूध यंत्राची स्वच्छता दूध काढण्यासाठी दुधयंत्राचा वापर केला जात असेल तर यंत्र वेळेवर स्वच्छ करावे.  ज्या जनावरांना कासदाह झाला आहे त्यांचे दूध हाताने काढावे. यंत्राचा वापर करु नये.

धार काढण्याची पद्धत जनावरांचे दूध काढताना पूर्ण हात पद्धतीचा अवलंब करावा.  आंगठ्याने किंवा चिमटीने धार काढल्यास जनावरांच्या सडाला इजा होण्याची शक्यता असते. जखेमीत जंतूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

गाभण जनावरांना योग्य पद्धतीने आटविणे जनावरांना आटविणे म्हणजेच त्यांचे दूध काढणे बंद करणे. असे सामान्यतः जनावर गाभण असण्याच्या आठव्या महिन्यामध्ये केले जाते. त्यामुळे वासरांची योग्य वाढ होते. त्याचबरोबर जनावराला विश्रांती मिळते. जास्त दूध देणाऱ्या जनावरांना आटविताना धार काढणे लगेच थांबवू नये. त्यामुळे कासदाह होण्याची शक्‍यता जास्त असते. 

दररोज दोन वेळा धार काढण्याएेवजी एकचवेळ धार काढावी. काही दिवसानंतर दोन दिवसातून एकदा धार काढावी आणि त्यानंतर काही दिवसांनी धार काढणे बंद करावे. जनावर आटल्यानंतर त्याच्या सडाच्या छिद्रामध्ये पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविकाचा वापर करावा. यामुळे जिवाणू आतमध्ये प्रवेश करत नाहीत.   संपर्क ः कुलदीप शिंदे, ९८८१४१४९६७ (पशुधन उत्पादन आणि व्यवस्थापन, राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था, कर्नाल, हरियाणा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

Vithhal Sugar Mill : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई अखेर मागे

Drought Crisis : पाण्याशिवाय जगणं मुश्किल झालंय

SCROLL FOR NEXT