जनावरांना वेळेवर अँथ्रॅक्‍स रोगावर प्रतिबंधक लसीकरण करावे.
जनावरांना वेळेवर अँथ्रॅक्‍स रोगावर प्रतिबंधक लसीकरण करावे. 
कृषी पूरक

अँथ्रॅक्‍स रोगावर प्रतिबंधात्मक लसीकरण अावश्यक

डॉ. विशाल केदारी, स्वामिनी नवले

अँथ्रॅक्‍स रोगावर प्रतिबंधात्मक लसीकरण अावश्यक जिवाणूंमुळे उद्‌भवणाऱ्या जनावरांच्या सांसर्गिक रोगांपैकी अँथ्रॅक्‍स हा एक रोग आहे. या रोगाचे जिवाणू सहसा श्‍वसनाद्वारे जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात अाणि ३ ते ७ दिवसांत लक्षणे दिसू लागतात. अँ थ्रॅक्‍स किंवा फाशी हा रोग काळपूज, गोळी, पेळू, सुश्‍या, नरपडे, भामथ्रा, हुमंडा या नावानेसुद्धा ओळखला जातो. यामुळे निरोगी दिसणारी जनावरे रोगांची लक्षणे दाखविण्यापूर्वी जमिनीवर पडून पाय झाडतात व मरतात.

जनावरांना अनेक रोग होतात. तिन्ही ऋतूंमध्ये विविध रोगांची साथ येते. जर जनावर अचानक मृत्युमुखी पडले आणि त्यांच्या मृत्यूचे कारण समजले नाही तर तत्काळ सर्व चाचण्या घ्याव्यात नाहीतर अँथ्रॅक्‍स हा रोग इतर जनावरांना आणि मनुष्यांनासुद्धा होऊ शकतो.   कारणे

हा रोग सस्तन प्राण्यांमध्ये बॅसिलस अँथ्रॅसिस या जिवाणूंमुळे होतो.  

रोग प्रसार

  • रोगाचा संसर्ग झालेल्या जनावरांच्या मलमुत्रातून, नाक अाणि डोळ्यांतून वाहणारे पाणी, रक्त व लाळ यांच्या संसर्गाने तसेच कुरणातील गवत, पाणी प्यावयाची भांडी यांच्याद्वारे या रोगाचा प्रसार होतो.
  • कुरणात चरणाऱ्या जनावरांच्या जखमांत हे जिवाणू प्रवेश करतात व त्याची वाढ झाल्यानंतर रोगांच्या लक्षणास सुरवात होते. या रोगात रक्त गोठत नाही व त्याचा रंग डांबरासारखा काळसर असतो.
  • अँथ्रॅक्‍सचे जिवाणू जमिनीत व संसर्गीत चारा-पाण्यामध्ये आढळतात. श्‍वसनाद्वारे व माश्यांमुळेसुद्धा हा आजार पसरतो.
  • लक्षणे

  • जनावराला फार ताप येतो. (१०४ ते १०८ अंश फॅरेनहाईट).
  • जनावरे चारा खात नाहीत, पाणी पित नाही. सुस्त होतात.
  • जनावरांचे पोट फुगते, झटके देते. दुधातून रक्त येते.  
  • अतितीव्र स्वरूपाच्या आजारात जनावर अचानक मृत्युमुखी पडते आणि मेलेल्या जनावराच्या तोंडातून, गुदद्वारातून, नाकातून, कानातून काळसर रंगाचे रक्त येते. हे रक्त गोठत नाही.
  • कातडीमध्ये रक्त जमा होते व शरीराच्या छिद्रामधून बाहेर पडते.
  • पाय लुळे पडतात.
  • शरीरावर, मानेवर सूज येते.
  • जनावराचा अचानक मृत्यू (२-३ तासांत) हे साधारण लक्षण आहे.
  • औषधोपचार

  • आजारपणाच्या सुरवातीच्या अवस्थेत जनावरे औषधोपचाराला चांगला प्रतिसाद देतात, यासाठी तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या मदतीने तातडीने उपचार करावेत.
  • पावसाळ्यापूर्वीच लस टोचून घेणे हा एक उत्तम उपाय आहे.
  • हा एक तीव्र स्वरूपाचा रोग असल्याने जनावर लवकरच मरण पावते, त्यामुळे सहसा उपचार शक्‍य होत नाही.
  • प्रतिबंधक उपाय

    जनावरांना वेळेवर प्रतिबंधक लसीकरण करावे.

    निदान

    या रोगाचे निदान बॅसिलस अँथ्रॅसिस हा जिवाणू रक्त, लाळ आणि जखमांमधून वेगळा करूनच केले जाऊ शकते.

    संपर्क ः डॉ. विशाल केदारी, ९५६१३०७२३१ (कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी, जि. नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

    Water Scarcity : आडातच नाही, तर...

    Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

    POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

    Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

    SCROLL FOR NEXT