गोचीडजन्य आजार टाळण्यासाठी गोठ्यामध्ये स्वच्छता राखावी.
गोचीडजन्य आजार टाळण्यासाठी गोठ्यामध्ये स्वच्छता राखावी. 
कृषी पूरक

नियंत्रण गोचीड, कीटकजन्य आजारांचे

डॉ. बाबासाहेब नरळदकर, डॉ. गजानन चिगुरे

आपल्या परिसरात टॅबॅनस/स्टोमोक्‍सीस या प्रजातींचे कीटक आढळल्यास जनावरांना सूर्यप्रकाशामध्ये चरायला सोडू नये. नियंत्रणासाठी वनस्पतिजन्य कीटकनाशकांची फवारणी करावी. आजारी जनावरांची काळजी घ्यावी.   अल्प किंवा अतिवृष्टीमुळे कीटक व गोचीडच्या संख्येत वाढ होते. ही वाढ जनावरांच्या आरोग्यासाठी चिंतेची बाब आहे. कीटक व गोचीड रक्त शोषण करतात, तसेच आदिजीवीजन्य आजारांचा प्रसारदेखील त्यांच्यामार्फत केला जातो. त्यामुळे ट्रिपॅनोझोमोसीससारखे कीटकजन्य आणि थायलेरीओसीस व बॅबेसीओसीससारख्या गोचीडजन्य आजारांचा प्रादुर्भाव पहायला मिळतो. पशुपालकांनी वेळीच आजारांचे निदान लक्षात घेऊन, तत्काळ पशुवैद्यकामार्फत उपचार करून घ्यावेत. तसेच गोचीडमुक्त गोठा ही संकल्पना राबवावी.   नियंत्रणाच्या रूपरेषा ः ट्रिपॅनोझोमोसीस (सरा) ः

  • टॅबॅनस/स्टोमोक्‍सीस या प्रजातींचे कीटक आढळल्यास जनावरांना सूर्यप्रकाशामध्ये चरायला सोडू नये.
  • नियंत्रणासाठी वनस्पतिजन्य कीटकनाशकांची फवारणी करावी.
  • आजारी जनावरांवर तात्काळ उपचार करावेत.
  • कळपामधील एका जनावराला आजाराची लागण झाल्याचे आढळल्यास इतरांची काचपट्टीद्वारे तपासणी करावी, आणि त्यांना प्रतिबंधात्मक औषधाची मात्रा तात्काळ द्यावी. यामुळे तीन महिन्यांपर्यंत या आजाराचा प्रादुर्भाव होत नाही.
  • बॅबेसीओसीस/थायलेरीओसीस ः

  • गोचीड नियंत्रण करावे.
  • आजारी जनावरांवर उपचार करावेत.
  • जनावराला सकस चारा द्यावा. रक्त वाढवणाऱ्या औषधांची मात्रा द्यावी.
  • इतर जनावरांची तपासणी व गरज भासल्यास औषधोपचार करावा.
  • संपर्क ः डॉ. बाबासाहेब नरळदकर, ९४०३८४७७६४ (परजीवीशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

    Rural Story : जागरण

    Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

    Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

    Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

    SCROLL FOR NEXT