प्रजनन क्षमता उत्तम राहण्याकरिता म्हशींना विविध क्षारांची मुबलक प्रमाणात आवश्‍यकता असते.
प्रजनन क्षमता उत्तम राहण्याकरिता म्हशींना विविध क्षारांची मुबलक प्रमाणात आवश्‍यकता असते. 
कृषी पूरक

म्हशींना खाद्यासोबत द्या खनिज मिश्रणे

डॉ. एम. व्ही. इंगवले

म्हशीच्या चयापचय क्रियेसाठी, शारीरिक वाढीसाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्तीकरिता, दूध उत्पादन वाढ व उत्पादन टिकून राहण्याकरिता, गर्भातील वासराच्या वाढीसाठी, प्रजनन क्षमता उत्तम राहण्याकरिता विविध क्षारांची मुबलक प्रमाणात आवश्‍यकता असते. म्हशीच्या आहारातील चारा, पशुखाद्यामधून पूर्ण होत नाही. याकरिता खाद्यासोबत जीवनसत्त्वयुक्त खनिज मिश्रण देणे गरजेचे आहे.   अाहारातील खनिज मिश्रण/ क्षार मिश्रणाचे महत्त्व

  • कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच मॅग्नेशिअम व क्षाराचा दूध उत्पादन व चयापचयामध्ये प्रमुख उपयोग होतो; म्हणून याचा वापर दररोज करावा.
  • झिंक, मॅग्नीज, सेलेनियम, आयोडीन यांसारखे सूक्ष्म क्षार रोगप्रतिकारकशक्ती तसेच प्रजनन कार्यात अत्यंत गरजेचे आहेत.
  • क्षार मिश्रणामुळे खाल्लेल्या आहाराची पाचकता सुधारते.
  • रेडकांची वाढ जोमाने होते.
  • विण्याच्या जवळपास होणारे आजार तसेच चयापचयाचा रोग (मिल्क फिवर, किटोसीस इ.) प्रतिबंध होतो.
  • म्हशीची प्रजननक्षमता चांगली होऊन उत्पादन वाढते.
  • चांगल्या प्रतीचे खनिज मिश्रण योग्य प्रमाणात म्हशींना द्यावे.
  • दुग्धोत्पादनाकरिता पाण्याचे महत्त्व

  • पाणी हा आहारासोबत आवश्‍यक घटक असून, म्हशींना पिण्यास स्वच्छ, गोड व जंतुविरहित पाणी देणे गरजेचे आहे.
  • म्हशीचे पाणी पिण्याचे प्रमाण शरीराचा आकार, चारा, हवामान, गाभण स्थिती व दूध उत्पादन क्षमता इ. गोष्टींवर अवलंबून असते.
  • सरासरी १ लिटर दूध उत्पादनाकरिता ५ लिटर पाण्याची गरज असते, यामुळे जास्त दूध उत्पादन देणाऱ्या म्हशींना सतत पाण्याचा पुरवठा होणे अत्यंत गरजेचे आहे.
  • म्हशींना सतत पाणीपुरवठा नसेल तर दिवसातून चार वेळा पाणी द्यावे.
  • उन्हाळ्यामध्ये पाण्याची आवश्‍यकता जास्त असते यामुळे थंड पाणी द्यावे.
  • पाणी पिण्याचा हौद स्वच्छ असावा व दर महिन्यांनी हौदाला चुना लावावा.
  • आजारी व रोगी म्हशींसाठी शक्‍यतो पाण्याची स्वतंत्र व्यवस्था असावी.
  • क्षारयुक्त तसेच जड, अस्वच्छ पाणी म्हशींना देऊ नये.
  • संपर्क ः डॉ. एम. व्ही. इंगवले, ९४०५३७२१४२ स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT