कोंबड्यांना पुरेसे खाद्य द्यावे.
कोंबड्यांना पुरेसे खाद्य द्यावे. 
कृषी पूरक

कोंबडी खाद्यनिर्मितीबाबत माहिती

क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा 

पोल्ट्री व्यवसायामध्ये एकूण खर्चाच्या ७० टक्के खर्च हा फक्त खाद्यावर होतो. कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या एकूण खाद्यापैकी ३५ ते ४५ टक्के खाद्याचे रूपांतर हे अंडी व मांसामध्ये होते.

  • कोंबड्यांच्या वाढीसाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी प्रथिनांची गरज असते. कडधान्यांमध्ये सुमारे आठ ते १२ टक्के आणि द्विदल धान्यांमध्ये ३० ते ४० टक्के प्रथिने असतात. कोंबडीखाद्यामध्ये वनस्पतिजन्य प्रथिने आणि प्राणिजन्य प्रथिनांचा समावेश करावा.
  • ज्वारी, गहू, मका, तांदूळ इ. धान्यांत पिष्टमय पदार्थ भरपूर असतात. हे घटक आहारात असावेत.
  • कोंबड्यांच्या वाढीसाठी स्निग्ध पदार्थांची आवश्‍यकता असते. हे पदार्थ अन्न तुटवड्याच्या कालावधीमध्ये शरीरास उष्णता व कार्यशक्ती पुरवितात. स्निग्ध पदार्थांमुळे खाद्याला चांगली चव येते. सर्व प्रकारचे खाद्यतेल व चरबी यांपासून स्निग्ध पदार्थ मिळतात.
  •  हाडांची बळकटी आणि अन्नपचनासाठी कोंबड्यांना खनिजांची आवश्‍यकता असते. कोंबड्यांच्या आहारात खनिजांचा वापर योग्य प्रमाणात केल्यास पायांतील अशक्तपणा दूर होतो. हाडांची योग्य पद्धतीने वाढ होते, त्यांना बळकटी मिळते. शरीरास कॅल्शिअम, लोह, मीठ, फॉस्फरस, आयोडीन, तांबे, सोडिअम, पोटॅशिअम, सेलेनिअम, मॅग्नेशिअम, मॅंगेनिज, झिंक इत्यादी खनिजांची आवश्‍यकता असते.
  • जीवनसत्त्वांमुळे कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते, उत्पादन वाढते. शरीर कार्यक्षम व तजेलदार राहण्यासाठी जीवनसत्त्वांचा उपयोग होतो.
  • संपर्क : ०२१६९ - २४४६८७  क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

    Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

    Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

    Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

    Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

    SCROLL FOR NEXT