गोचीडांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवणे अावश्‍यक अाहे.
गोचीडांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवणे अावश्‍यक अाहे. 
कृषी पूरक

थायलेरियोसीस, बबेसियोसीस रोगाकडे दुर्लक्ष नको  

के. एल. जगताप, डॉ. एन. के. भुते

गोचीड बबेसियोसीस, थायलेरियोसीस या रोगांचा प्रसार करतात. निरोगी जनावरांचा बाधित जनावरांशी संपर्क, गोठ्यातील अस्वच्छता, जनावरांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष या कारणांमुळे रोगांचा प्रसार वाढतो. रोगांच्या प्रादुर्भावाची लक्षणे तपासून पशुतज्ज्ञांकडून उपचार करावेत.   गोचीडासारखे बाह्य परजीवी जनावरांच्या शरीराचा चावा घेतात. गोठ्याच्या सभोवतालच्या वातावरणात बाह्य परजीवींची असंख्य अंडी असतात. बऱ्याचदा बाह्य परजीवींमुळे उद्‌भवणाऱ्या रोगांमुळे जनावरांचा मृत्यूसुद्धा होतो. थायलेरियोसीस

  • थायलेरिया अन्युलेटा या जंतुमुळे हा आजार होतो. हे जंतू लिंफ ग्रंथीमध्ये वाढतात. ग्रंथीचा आकार वाढून त्या सुजतात. जनावरांना १०४ ते १०६ अंश फॅरनहाईटपर्यंत ताप येतो.
  • या आजाराचे जंतू रक्तातील तांबड्या पेशीवर वाढतात. कालांतराने पेशींचा नाश होतो अाणि रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते.
  • आजाराचे तीव्रतेनुसार अति तीव्र, तीव्र अाणि जुनाट आजार असे तीन प्रकार पडतात.
  • अति तीव्र आजारामध्ये रक्तातील तांबड्या पेशी झपाट्याने मरतात. जनावरे १-४ दिवसांत मरण पावतात. औषधोपचाराला प्रतिसाद देत नाहीत.
  • तीव्र आजारामध्ये जनावराला ताप येतो. लिंफ ग्रंथी सुजतात. उपचार केल्यास ५० टक्के जनावरे बरी होतात.
  • जुनाट आजारामध्ये तापाचे प्रमाण जास्त असते. योग्य वेळी योग्य उपचार केल्यास ९० टक्के जनावरे बरी होतात.
  • बबेसियोसीस

  • बाबेसिया बायजेमिया या जंतुमुळे हा आजार होतो.
  • या अाजाराचे जंतू तांबड्या पेशीवर वाढून पेशींचा नाश करतात.
  • जनावराला १०५ ते १०७ अंश फॅरनहाइटपर्यंत तीव्र ताप येतो.
  • लघवी लाल होते अाणि जनावरे अचानकपणे मरतात.
  • जनावराच्या पाठीमागील पायातील ताकद कमी होते. कावीळची लक्षणे दिसून येतात.
  • गाभण जनावरे गाभडतात. मेंदूवर आघात होऊन झटके येतात. पशुवैद्यकांकडून वेळीच उपचार करून घेणे अावश्‍यक असते.
  • संपर्क ः के. एल. जगताप, ९८८१५३४१४७ (कृषी विज्ञान केंद्र, खामगाव, जि. बीड) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

    Crop Damage : गारपीट, वादळी पाऊस होऊनही पीक नुकसान नसल्याचा अहवाल

    Veterinary : पशुचिकित्सा पुनर्रचनेविरोधात पदविकाधारकांनी थोपटले दंड

    Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

    Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

    SCROLL FOR NEXT