identify adulterantation in milk
identify adulterantation in milk  
कृषी पूरक

..अशी ओळखा दुधातील भेसळ

डॉ. अरविंद सावते, सुग्रीव शिंदे

वाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ केली जाते किंवा त्याच्या दर्जा कमी केला जातो. अशा भेसळयुक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला नुकसान होते. त्या दृष्टिने काळजी घ्यावी. भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) मते, भारतात विकले जाणारे जवळपास १० टक्के दूध आरोग्यासाठी हानिकारक आहे. या १० टक्क्यांमध्ये ४० टक्के प्रमाण हे पिशवीबंद दुधाचे आहे. भेसळयुक्त पदार्थांचे सेवन करणाऱ्या लोकांना आतड्यांचे विकार, यकृत आणि किडनीसंबंधी आजार होण्याचा धोका संभावतो.   दुधातील पाण्याचे निदान  

  • एका पॉलिश केलेल्या फरशीवर दुधाचे काही थेंब टाका. दुधात पाणी असेल तर ते लगेच पुढे सरकेल व कोणतेही डाग दिसणार नाहीत. मात्र दुधात पाणी मिसळले नसल्यास, ते पटकन पुढे किंवा मागे सरकणार नाही व त्याजागी पांढरे डाग पडतात.
  • युरियाची भेसळ  

  • एका परीक्षा नळीमध्ये ५ मिलि दूध घेऊन त्यात ब्रोमोथायलॉन या निळ्या औषधाचे २ थेंब टाकून दहा मिनिटे ठेवावे. युरियाची भेसळ असल्यास, द्रावणास निळा रंग येईल.
  • डिटर्जंटची भेसळ  

  • ५ ते १० मिलि दूध चांगले हालवून घ्यावे. दुधाला फेस किंवा फेसाप्रमाणे जाड थर तयार झाल्यास, भेसळ आहे असे समजावे.
  • स्टार्चची भेसळ

  • दुधात २ ते ३ थेंब टिंक्चर आयोडीन टाकावे. भेसळ असल्यास निळा रंग येईल.
  • पनीर आणि खव्यातील स्टार्चची भेसळ  

  • पनीर अथवा खव्याचा थोडा नमुना पाण्यात उकळून घ्यावा. मिश्रण थंड करून त्यात आयोडीनचे २ ते ३ थेंब टाकावे. स्टार्चची भेसळ असल्यास, निळा रंग येतो.
  • तुपामध्ये बटाटे किंवा रताळ्याचा गर आणि इतर स्टार्चची भेसळ  

  • अर्धा चमचा तूप एका पारदर्शक वाटीत घ्यावे. त्यात दोन ते तीन थेंब आयोडिन घालावे. भेसळ असल्यास, तुपाला निळा रंग येतो.
  • तुपामध्ये वनस्पती तुपाची भेसळ  

  • एका छोट्या वाटीत चमचाभर तूप किंवा लोणी गरम करून घ्यावे. त्यात चमचाभर हायड्रोक्लोरिक आम्ल आणि चिमूटभर साखर टाकून मिश्रण थोडे हालवून नंतर ५ मिनिटे स्थिर ठेवावे. वनस्पती तुपाची भेसळ असल्यास, मिश्रणाच्या तळाला नारिंगी थर दिसेल.
  • आइस्क्रीममध्ये डिटर्जंटची भेसळ

  • भेसळयुक्त आइस्क्रीममध्ये लिंबाचे काही थेंब टाकल्यास बुडबुडे येतात. याउलट भेसळ नसल्यास बुडबुडे येत नाहीत.
  • आइस्क्रीममध्ये सॅकॅरिनची भेसळ  

  • आइस्क्रीममधील सॅकॅरिनची भेसळ चवीवरून ओळखता येते. सॅकॅरिनची गोड चव जिभेवर जास्त वेळ राहून नंतर कडवट चव तयार होते.
  • संपर्कः डॉ. अरविंद सावते, ९४२२१७६३५४ (अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

    Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

    Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

    Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

    Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

    SCROLL FOR NEXT