Bull
Bull 
कृषी पूरक

शिंगाच्या कर्करोगाकडे करू नका दुर्लक्ष

डॉ.स्वप्निल जाधव

अलीकडच्या काळात बैलातील शिंगाच्या कर्करोगाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. शिंगाचा कर्करोग हा अत्यंत वेगाने पसरतो. त्याची सुरुवात बैलाच्या शिंगाच्या बुडाला असलेल्या थरापासून होते. 

पांढरी त्वचा असलेल्या आणि शिंगाची लांबी जास्त असलेल्या बैलांमध्ये शिंगाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आढळून येते.ज्या बैलांचे वय १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा बैलांमध्ये हा आजार प्रामुख्याने आढळून येतो. वय वाढलेल्या बैलांमध्ये हा आजार कदाचित तणावामुळे जास्त प्रमाणात दिसून येतो. खच्चीकरण झालेल्या बैलांमध्ये हा आजार प्रामुख्याने प्रचलित आहे. 

  • शिंगाचा कर्करोग हा अत्यंत वेगाने पसरणारा कर्करोग आहे. त्याची सुरुवात बैलाच्या शिंगाच्या बुडाला असलेल्या थरापासून होते. कालांतराने बैलामध्ये शिंगाच्या कर्करोगाची लक्षणे दिसू लागतात. 
  • शिंगाचा कर्करोग हा डाव्या किंवा उजव्या कोणत्याही शिंगाला होऊ शकतो. साधारणपणे एका वेळी एकाच शिंगाचा कर्करोग आढळून येतो. त्वरित उपचार न केल्यास तोच कर्करोग दुसऱ्या शिंगालाही होऊ शकतो.  
  • शिंगाचा कर्करोग झालेल्या बैलांमध्ये अवजड काम करण्याची शक्ती कमी होते. गाईंमध्ये दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. शिंगाचा कर्करोग झालेल्या बैलावर उपचार म्हणून शस्त्रक्रिया करावी लागते.
  • प्रतिबंधात्मक काळजी 

  • शिंगाला रंग लावू नये. शिंगावर मारहाण करू नये.
  • बैलाच्या शिंगाला दोरीने जखडून बांधू नये. शिंगाला वारंवार होणारी इजा टाळावी.
  • बैल आकर्षक दिसण्यासाठी दोन्ही शिंगे एकसमान करू नये.
  • शेतीची कामे करताना बैलाच्या मानेवरील जू वारंवार शिंगाला लागणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • कर्करोगाची कारणे 

  • शिंगाला मार लागणे, वारंवार इजा होणे.शिंगाला रंग लावणे, जास्त कालावधीसाठी शिंगाला दोरीने घट्ट आवळून बांधणे. शिंगाला मानेवरील जू मुळे वारंवार इजा होते.
  • शरीरातील संप्रेरकांचा समतोल बिघडणे. जनुकीय कारणे, विषाणू किंवा एकपेशीय सूक्ष्मजीवांचा संसर्ग.
  • शिगांवर जास्त काळासाठी सूर्यप्रकाश पडणे. बैल आकर्षक दिसण्यासाठी दोन्ही शिंगे एकसमान करणे.
  • कर्करोगाची लक्षणे  पहिला टप्पा 

  • वारंवार डोके हालवणे.शिंगाला वारंवार पाय मारणे. एखाद्या कठीण वस्तूला शिंगाने घासणे.
  • दोन शिंगामध्ये प्रमाणबद्धता नसणे,शिंगाचा आकार बदलणे.
  • शिंगाचे बुड मऊ आणि गरम होणे.शिंगाच्या बुडाला हात लावला असता बैलाला खूप वेदना होतात.
  • काही वेळेस शिंगाच्या बाजूच्या नाकपुडीतून रक्तमिश्रीत असलेला चिकट स्राव येणे.
  • दुसरा टप्पा  

  • शिंग एका बाजूला झुकते. बुडाला जखम होते. शिंगाच्या बुडातून घाण वास येतो. पू आणि रक्तमिश्रीत चिकट स्राव येतो.
  • शिंग बुडापासून हालू लागते. शिंगाच्या बाजूच्या नाकपुडीतून रक्तमिश्रीत असलेला घाण वास येणारा चिकट स्राव येतो.
  • तिसरा टप्पा 

  • शिंग पूर्णपणे एका बाजूला झुकते. शिंग बुडापासून उन्मळून पडते.
  • शिंग उन्मळून पडल्यानंतर शिंगाच्या बुडाला फ्लॉवर सारखा मांसल भाग दिसून येतो. त्यातून रक्त बाहेर येण्याची शक्यता असते. त्यामध्ये सूक्ष्मजीवांच्या संसर्गामुळे घाण वास येतो.
  • बैलाचे चारा खाणे, पाणी पिणे मंदावते. हालचाल मंद होते.
  • उपचार 

  • कर्करोग झालेल्या बैलाचे शिंग बुडापासून शस्त्रक्रिया करून काढून टाकावे लागते.  
  • - डॉ.स्वप्निल जाधव,  ८४१२८१४१५७.,  डॉ. चैत्राली आव्हाड ८३८०८९७७४८. 

    (डॉ.स्वप्निल जाधव पुणे महानगरपालिका पशुवैद्यकीय अधिकारी आणि डॉ. आव्हाड निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे क्युरेटर आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

    Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

    Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

    Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

    Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

    SCROLL FOR NEXT