पाण्याचे तापमान, सामू, विरघळलेला प्राणवायू यांच्या प्रमाणानुसार निर्माण होणाऱ्या जैवपुंजाचे पोषण मूल्य बदलत असते. नायट्रोजनच्या मात्रेनुसार आपण कार्बन स्रोतांची दैनंदिन मात्रा ठरवू शकतो.
जैवपुंज (बायोफ्लॉक) तयार करण्यासाठी विविध कार्बन स्रोतांचा वापर केला जातो. चांगल्या प्रकारच्या जैवपुंज निर्मितीसाठी विविध प्रकारचे कार्बन स्रोत वापरले जातात. सध्या मनुष्य आणि प्राण्यांच्या अन्ननिर्मिती कारखान्यातून निर्माण होणारे विविध वनस्पतीजन्य घटक पदार्थांचा जैवपुंज निर्मितीसाठी कार्बन स्रोत म्हणून वापर मोठ्या प्रमाणात होतो. एखाद्या घटकपदार्थाची आपण कार्बन स्रोत म्हणून निवड करताना याची स्थानिक उपलब्धता, किंमत, विघटनशीलता, जिवाणू निर्माण करण्याची क्षमता या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे. सध्या बाजारात अनेक प्रकारचे कार्बन स्रोत उपलब्ध असले तरी स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या कार्बन स्रोताचा जास्तीत जास्त वापर जैवतंत्रज्ञानासाठी होणे आवश्यक आहे. याचा असा फायदा होतो की ते सहज उपलब्ध असतात, तसेच स्वस्त असतात. मुख्य म्हणजे काही घटकपदार्थ मनुष्याच्या दैनंदिन जीवनात कमी प्रमाणात वापरले जात असले तरी जैवपुंज निर्मितीसाठी त्यांचा खऱ्या अर्थाने चांगला वापर होऊ शकतो.
जैवपुंज निर्मितीत कार्बन स्रोतांचा वापर
मत्स्य संवर्धनासाठी वापरले जाणारे कार्बन स्रोत
- डॉ. केतन चौधरी, ९४२२४४११७८ (मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, जि. रत्नागिरी)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.