पशुआहारात वापरा शतावरी 
कृषी पूरक

पशुआहारात वापरा शतावरी

कु. प्रणिता सहाणे

जनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर ठरतो. गाई, म्हशीच्या दुग्धोत्पादनात वाढ करण्यासाठी शतावरी वनौषधींचा वापर फायदेशीर ठरतो. दुग्धोत्पादनाचा संबंध हा दुधाळ जनावरांच्या आरोग्याशी आणि आहाराशी असतो. जनावराला कितीही उत्तम चारा किंवा खाद्य दिले पण जनावरांचे आरोग्य चांगले नसेल, तर दुग्धोत्पादनात वाढ होणे शक्य नाही. जनावरांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सगळ्याच ऋतूमध्ये त्यांचे आजारांपासून संरक्षण करणे गरजेचे असते. जनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर ठरतो. दुधाळ जनावरांचे स्वास्थ आणि दूधवाढीसाठी उपयुक्त व लाभदायक वनस्पती आपल्याकडे आहेत त्यांचा वापर पशुआहारात करणे आवश्यक आहे. शतावरीच्या मुळ्या, अंकुर हा उपयुक्त भाग आहे. शतावरीचे फायदे: १) दुभत्या जनावरांसाठी शतावरी ही एक अत्यंत उपयुक्‍त वनस्पती आहे. यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहते. २) जनावरांची रोगप्रतिकार शक्‍ती वाढते त्याचबरोबर त्यांच्या आजारांवरील उपचारांसाठी येणारा खर्च कमी होतो. ३) शतावरी दिल्याने गाई, म्हशीमधील दूध उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे दिसून येते. तसेच २५ ते ३० टक्के नवजात जनावरांच्या वजनात वाढ होते. शतावरीचा वापर केल्यानंतर जनावरे योग्य वेळी तयार होतात. ४) शतावरीच्या कंदामध्ये सॅपोनिन, ग्लायकोसाइड्‌स, फॉस्फरस, रिबोफ्लेव्हिन, थायमाईन, पोटॅशियम, कॅल्शियम व इतरही रासायनिक द्रव्ये आहेत. औषधी उपयोग: १) गाई म्हशीमधील दूध वाढविण्यासाठी वापर : गाई म्हशी (दुभती) वापरण्याचा प्रकार : शतावरी वनस्पतीच्या वाळविलेल्या मुळांची भुकटी मात्रा: १) व्यायल्यानंतर २० ते ३० दिवस होण्यापूर्वी आणि ९० दिवसांनंतर शतावरी देणे उपयुक्त. २) दूध देत असेपर्यंत रोज ३० ग्रॅम सकाळी आणि ३० ग्रॅम सायंकाळी खाद्यातून शतावरीच्या मुळांची भुकटी द्यावी. संपर्क ः कु. प्रणिता सहाणे ८६००३०१३२९ ( कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, गुंजाळवाडी पठार, संगमनेर, जि. नगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Procurement Delay: केंद्राच्या कांदा खरेदीचा बोजवारा; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Agriculture Department Distributes Laptops: तेरा हजार कृषी अधिकाऱ्यांना मिळणार लॅपटॉप

Rohit Pawar Hunger Strike: मंत्री महाजनांच्या आश्वासनानंतर रोहित पवारांचे आंदोलन स्थगित

Online Fertilizers Sale: कोल्हापुरात ऑनलाइन खतविक्रीला विरोध कायम

Lumpy Skin Disease Vaccination: लम्पी प्रतिबंधासाठी ३७.५२ लाख गोटपॉक्स लसमात्रांचे वाटप

SCROLL FOR NEXT