Neem, Karanj is useful for dermatitis
Neem, Karanj is useful for dermatitis 
कृषी पूरक

त्वचाविकारावर कडुलिंब, करंज उपयुक्त

डॉ. सुधीर राजूरकर

संक्रमित त्वचा विकाराच्या आजारांमुळे हे उपचारासाठी देखील किचकट बनतात. या आजारांचे निदान व त्यावरील उपचार हे पशुवैद्यकांच्या द्वारे आणि त्यांच्या सल्ल्यानेच करावेत. सुरुवातीस त्वचेवर एखादा चट्टा किंवा पुरळ येऊन त्या भागात खाज सुटते. असे जनावर गोठ्यातील भिंत किंवा एखादा खांब यास आपले अंग घासते, यामुळे त्या भागातील त्वचा लाल होते. ही त्वचाविकाराची सुरुवातीचे लक्षणे आहेत. सुरुवातीची लक्षणे आढळताच उपचार तत्काळ करावेत किंवा यावर संसर्ग होतो. या आजाराची तीव्रता वाढत जाते, बाधित भागावर जखमा होतात, त्यातून पाणी गळते. त्वचा विकारांवर उपचार करण्यापूर्वी त्यांचे नेमके निदान होणे अत्यंत आवश्यक आहे. कारण जनावरांना परोपजीवी, जिवाणू, बुरशी किंवा इतर अनेक कारणांमुळे त्वचाविकार संभवतात. विविध प्रकारच्या त्वचाविकारांवर औषधी वनस्पतीद्वारे उपचार करणे सहज शक्य आहे. उपयुक्त औषधी वनस्पती करंज करंजी किंवा करंज या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळते. ही वनस्पती जिवाणूविरोधी, बुरशीविरोधी, परोपजीवीविरोधी असल्यामुळे त्वचा विकारांमध्ये हिचा वापर अत्यंत उपयुक्त आढळतो. या वनस्पतीचे फळ औषधीमध्ये वापरतात. याचे तेल बाजारपेठेत मिळते. त्याचा वापर त्वचाविकारांवर करावा. अर्जुन  औषधात या वनस्पतीची साल वापरतात. हाडांची वाढ, बळकटीसाठी, हृदयाच्या आजारात याचा वापर होतो. यासोबतच त्वचाविकारात व जर यातून रक्तस्राव होत असेल तर अशा वेळी ते रक्त थांबवण्यासाठी अर्जुन ही अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे.  त्वचा विकाराच्या उपचारानंतर त्वचा परत पहिल्यासारखी व्हावी यासाठी अर्जुन साल उपयुक्त ठरते. या सालीची बारीक पावडर करून व्यवस्थित चाळून घ्यावी आणि त्वचाविकारात / रक्तस्राव ज्या ठिकाणी होत आहे तिथे लावावी.  हळद  हळदीमध्ये जिवाणूविरोधी, सूजविरोधी व वेदनाशामक गुण आहेत. हळदीची पावडर त्वचाविकारात लावावी. यामुळे त्वचाविकार लवकर बरे होतात. कण्हेर  कण्हेर ही वनस्पती  तिच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे. याचप्रमाणे त्वचाविकारांमध्ये या वनस्पतीचे पाने आणि मूळ अत्यंत उपयुक्त आहे. या वनस्पतीची पाने अथवा मूळ ओले असतानाच ठेचून घ्यावे. ज्या ठिकाणी त्वचाविकार झालेला आहे. त्या ठिकाणी याचा लेप द्यावा. त्वचाविकारांसोबतच बाह्य परोपजीवी यांचे नियंत्रण करण्यासाठी या वनस्पतीचा वापर होतो तुळस तुळशीचे पाने किंवा बी म्हणजेच मंजुळा यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. तुळशीमध्ये जिवाणूविरोधी व बुरशीविरोधी गुणधर्म आहेत.  याचा वापर त्वचाविकारांमध्ये अत्यंत उपयुक्त असा आढळतो. कडुलिंब  कडुलिंबाचे तेल, लिंबोळी, पाने याचे औषधी गुणधर्म आहेत. कडुलिंब हे जिवाणूविरोधी, बुरशीविरोधी, परोपजीवीविरोधी असल्यामुळे त्वचा विकारांमध्ये कडुलिंबाचा वापर अत्यंत उपयुक्त आढळतो. कडुलिंबाचा वापर करत असताना त्याच्या तेलाचा वापर केल्यास अधिक गुणकारी ठरतो. टीप वरील सर्व वनस्पती एकत्र करून बारीक कराव्यात. जर या सर्व वनस्पती ताज्या व ओल्या असतील  तर त्यांचा लेप त्वचाविकारात लावावा. जर त्या वाळलेल्या असतील तर त्यांची भुकटी करून त्वचाविकारांवर दिवसातून किमान दोन वेळा लावावी. - डॉ. सुधीर राजूरकर,  ९४२२१७५७९३,  (प्राध्यापक, पशू औषधी व विषशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, परभणी, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उन्हाचा चटका असह्य; राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज कायम

Water Scarcity : भूजल पातळीत घट; ३४ गावांत हातपंप बंद

Agriculture Irrigation : निळवंडेचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको ः आमदार तनपुरे

Crop Loan : जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

Canal Work : गोसेखुर्द कालव्याचे काम रखडले

SCROLL FOR NEXT