Uzi fly on silkworm. 
कृषी पूरक

रेशीम अळीवरील उझी माशीचे व्यवस्थापन

अशोक जाधव

रेशीम कीटक व अळीवर उपजीविका करणारी परोपजीवी कीड म्हणजे उझी माशी. उझी माशीची एक मादी रेशीम कोषाचे उत्पादन अर्धा किलोपर्यंत कमी करते. उझी माशीचा प्रादुर्भाव विशेषतः पावसाळ्यात आणि हिवाळ्यात अधिक प्रादुर्भाव दिसून येतो.

रेशीम कीटक व अळीवर उपजीविका करणारी परोपजीवी कीड म्हणजे उझी माशी. मागील ३-४ वर्षांपासून रेशीम अळ्यांवर उझी माशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यात प्रामुख्याने बीड, उस्मानाबाद, परभणी, जालना, नांदेड या उझी माशीचा प्रकोप अधिक प्रमाणात होता. उझी माशीची एक मादी रेशीम कोषाचे उत्पादन अर्धा किलोपर्यंत कमी करते. नुकसानीचा काळ  उझी माशीचा प्रादुर्भाव वर्षभर आढळतो. विशेषतः पावसाळ्यात आणि हिवाळ्यात अधिक प्रादुर्भाव दिसून येतो. लक्षणे रेशीम अळ्यांच्या शरीरावर काळे डाग दिसतात. कोषाच्या टोकाला गोलाकार छिद्र दिसते. हे उझी माशीच्या प्रादुर्भावाची प्रमुख लक्षणे आहेत. उझी माशीचे जीवनचक्र  उझी माशी साधारण १८ ते २२ दिवसांत जीवनचक्र पूर्ण करते.

  • उझी माशी एका वेळी किमान ४०० ते ५०० अंडी देते. अंडी २ ते ३ दिवसांत फुटून त्यातून माशीच्या अळ्या बाहेर पडतात. अळी अवस्था ६ ते ८ दिवस राहते.
  • अळीचे रूपांतर कोषामध्ये होते. ही अवस्था १० ते १२ दिवस असते. कोषाचे रूपांतर १२ ते २० दिवसांनी वयस्क माशीमध्ये होते.
  • एकात्मिक व्यवस्थापन 

  • रेशीम संगोपनगृहाच्या खिडक्या, दरवाजावर वायर किंवा नायलॉनची जाळी लावावी. जेणेकरून माशीला संगोपनगृहामध्ये येण्यास अटकाव होईल.
  • उझी माशी पिवळ्या रंगाकडे आकर्षित होते. त्यासाठी पांढऱ्या रंगाच्या ट्रेमध्ये उझीनाशकाची गोळी टाकून पिवळ्या रंगाचे द्रावण तयार करावे. हा ट्रे संगोपनगृहाच्या खिडकीच्या आतमध्ये आणि बाहेर असे दोन्ही बाजूस जमिनीवर ठेवावे.
  • माशीला आकर्षित करण्यासाठी खिडक्या किंवा दरवाज्यावर पिवळे चिकटे सापळे लावावेत.
  • निसोलायनेक्स थायमस (Nesolynx Thymus) हा उझी माशीच्या कोषावर उपजीविका करणारा परोपजीवी कीटक आहे. संगोपनगृहात रेशीम कीटकांनी चौथी कात टाकल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी हे परोपजीवी कीटक सोडावेत. १०० अंडीपुंजासाठी परोपजीवी कीटकांची दोन पाकिटे पुरेशी होतात.
  • रेशीम कीटकांची विष्ठा शेतात उघड्यावर किंवा खताच्या खड्ड्यावर फेकू नये. त्यात शेकडो उझी माशीच्या सुप्त अवस्था (कोष) असतात. रेशीम कीटकाची विष्ठा पॉलिथिन बॅगमध्ये १५ ते २० दिवसापर्यंत बंद अवस्थेत ठेवावी. म्हणजे उझी माशी विष्ठेतून बाहेर पडणार नाही किंवा कीटकांची विष्ठा खड्ड्यात लगेच गाडून टाकावी किंवा जाळून नष्ट करावी.
  • कामगंध सापळ्यांचा वापर  केंद्रीय रेशीम उत्पादन संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, म्हैसूर आणि नॅशनल ब्युरो ऑफ ॲग्रिकल्चरल इन्सेक्ट रिसोर्सेस, बेंगळुरू यांनी उझी माशीच्या प्रभावी नियंत्रणासाठी कामगंध सापळे विकसित केले आहेत. यामध्ये मादी माशीच्या शरीरातील विशिष्ट गंधाचा वापर केला आहे. हा गंध नर माशीला आकर्षित करतो.

  • या सापळ्यांमध्ये वापरलेल्या गंधाकडे उझी माशीचे नर आकर्षित होतात. माशीचे नर सापळ्यांत अडकल्यामुळे प्रजननामध्ये अडथळा येऊन नवीन माशीची उत्पत्ती रोखली जाते.
  • संगोपनगृहातील खिडक्या किंवा दरवाजावर कामगंध सापळे लावावेत. दोन सापळ्यांमध्ये २० फूट अंतर राखावे.
  • सापळ्याचे फायदे 

  • सापळे पर्यावरणपूरक असून यामुळे प्रदूषण होत नाही.
  • या सापळ्यांद्वारे फक्त उझी माशीचे नियंत्रण होते. इतर कीटक किंवा सूक्ष्मजीवांना कोणताही धोका निर्माण होत नाही.
  • वर्षभरात कोणत्याही हंगामात कामगंध सापळे वापरता येतात.
  • सापळ्यांच्या मदतीने संगोपनगृहातील उझी माशीच्या प्रादुर्भावाचा अंदाज लावणे शक्य होते.
  • - अशोक जाधव, ९०७५० ८८७५५, ०२४५२ २३३२७७ (संशोधन विस्तार केंद्र, केंद्रीय रेशीम बोर्ड, वस्त्र मंत्रालय, भारत सरकार, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

    Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

    Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

    Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

    Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

    SCROLL FOR NEXT