If the cowshed is clean and dry, the health of the animal remains good.
If the cowshed is clean and dry, the health of the animal remains good. 
कृषी पूरक

पशुपालन सल्ला

डॉ. विनोद जानोतकर

पावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे गोठ्यात ओलसरपणा वाढतो. परिणामी, आजाराचे प्रमाणसुद्धा वाढते. पावसाळ्यात जनावरांच्या खाद्यात बदल झाल्यामुळे पोटाचे आजार निर्माण होतात. या काळात होणारे आजार टाळण्यासाठी गोठ्याची स्वच्छता व लसीकरण फायद्याचे ठरते.

  • गोठ्यातील जमीन व्यवस्थित असावी.
  • पावसाचे पाणी गोठ्यात येऊ नये यासाठी बाजूला पोत्याचे लावावेत. गोठा ओलसर होणार नाही.
  • गोठा स्वच्छ व कोरडा असल्यास जनावरांचे आरोग्य चांगले राहते.
  • गोठा कोरडा राहावा याकरिता वाया गेलेल्या कुटारात चुना/चुन्याची पावडर मिसळून पातळ थर पसरावा. त्यामुळे आद्रता कमी होईल.
  • गोठ्यात भरपूर हवा व सूर्यप्रकाश येईल याची काळजी घ्यावी.
  •  गोठा ८ ते १५ दिवसांतून जंतुनाशकाचे द्रावण वापरून स्वच्छ निर्जंतुक करावा.
  • गोठ्यामध्ये डास, गोचिड होणार नाहीत याची काळजी घ्यावी. जनावरांना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने जंतनाशके द्यावीत.
  • गाई, म्हशीचे दूध काढण्याअगोदर आणि नंतर सड आणि कास पोटॅशिअम परमॅंगनेटच्या द्रावणाने स्वच्छ करावी. जेणे कासदाह आजार होणार नाही.
  • घटसर्प, एकटांग्या आजाराच्या नियंत्रणासाठी लसीकरण करावे. शेळ्या- मेंढ्यांमध्ये आंत्रविषार नियंत्रणासाठी लसीकरण करावे.
  • शेळ्यांना पावसाळ्यात संडास लागणे, अपचन, पोटफुगी हे आजार होतात. या काळात जनावरांना नदी नाल्याकाठी चरावयास सोडू नये. कारण दूषित पाणी पिऊन आजारपण येते.
  • पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला, माळरानात गवत उगवलेले असते. जनावर हे गवत खाण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी गवताची उंची जास्त नसल्याने जनावराचे तोंड जमिनीला घासते व जखमा होतात. यावर त्वरित पशू वैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत.
  • संपर्क : डॉ. विनोद जानोतकर, ९३२५७७१३३४ (विषय विशेषज्ञ (पशू संवर्धन) कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद, जि. बुलडाणा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Market : कोट्यापेक्षा जादा साखर विक्री कारखान्यांना पडली महागात

    Weather Update : सूर्य तळपल्याने होरपळ वाढली

    Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

    Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

    Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

    SCROLL FOR NEXT