cattle health advisory
cattle health advisory 
कृषी पूरक

जनावरांमधील पायाचा वात

डॉ. शुभांगी वाघमारे, डॉ. इरावती सरोदे

या आजारामध्ये जनावरात तात्पुरते अपंगत्व म्हणजेच बाधित पायामध्ये लंगडेपणा येतो. यामुळे कार्यक्षमतेवर आणि हालचालीवर परिणाम होतो. शिवाय प्रभावित जनावराचे बाजारमूल्य देखील कमी होते. शेतात काम करणाऱ्या जनावरांमध्ये ही समस्या उद्‍भवल्यास कामांचे नियोजन विस्कळीत होऊ शकते. जनावरांमध्ये मुख्यतः गोवंशामध्ये मागील एका किंवा दोन्ही पायांमध्ये वात असण्याची समस्या दिसून येते. थंड वातावरणामध्ये वाताची लक्षणे अधिक तीव्र होतात. या आजारामध्ये जनावरात तात्पुरते अपंगत्व म्हणजेच बाधित पायामध्ये लंगडेपणा येतो. यामुळे कार्यक्षमतेवर आणि हालचालीवर परिणाम होतो. शिवाय प्रभावित जनावराचे बाजारमूल्य देखील कमी होते. शेतात काम करणाऱ्या जनावरांमध्ये ही समस्या उद्‍भवल्यास कामांचे नियोजन विस्कळीत होऊ शकते. या आजारामध्ये गरजेच्या शस्त्रक्रियेसाठी कुशल विषेशज्ञ नसल्याने वेळेवर उपचार उपलब्ध होत नाहीत. आजाराची कारणे हा आजार मागील पायाच्या गुडघ्याची वाटी उर्ध्वगामी स्थिर झाल्याने होतो. वाटी उर्ध्वगामी स्थिर होण्याची मुख्य कारणे ः  

  • आनुवंशिकता
  • पोषण कमतरता 
  • कामाचा अतिरेक 
  • बाह्य मुकामार 
  • वाटीच्या सांध्याचे (स्टाइफल सांधा) अकारीय बदल 
  • वाटीच्या बाजूच्या स्नायूंचे (क्रुरल ट्राइसेफ स्नायू) तीव्र आकुंचन.
  • मुख्य लक्षणे

  • विश्रांतीनंतर वात असलेल्या पायाने वैशिष्ट्यपूर्ण लंगडणे. पाय आकडताना किंवा आकुंचन करताना झटके देणे.
  • वाताच्या पायाचा विस्तार व खुराच्या वरील सांध्याचे आकुंचन होते.
  • एका पायात वात असल्यास, तो पाय पुढे टाकताना बाहेरच्या बाजूला अर्धगोलाकार फिरवून पुढे टाकणे. 
  • जेव्हा दोन्ही पायांत वात असतो, त्या वेळी दोन्ही पायांचा विस्तार झाल्यामुळे जनावराला खाली बसता येत नाही. तसेच पाऊल पुढे टाकता येत नाही.
  • आजार गंभीर झाल्यास वाताच्या पायाचे स्थिरीकरण होते.
  • काही जनावरांमध्ये वाताच्या पायाचा संबंध सतत जमिनीशी आल्याने खुराच्या वरील भागाला जखम होऊ शकते.
  • लक्षणे काही काळ चालल्यानंतर दिसत नाहीत. मात्र विश्रांतीनंतर पुन्हा दिसतात.
  • उपचार 

  • शस्त्रक्रिया हाच योग्य उपचार आहे. 
  • वात असलेल्या पायाच्या वाटीला (पटेला हाडाला) जोडणाऱ्या आतील अस्थिबंधनाची शस्त्रक्रिया केली जाते.
  • शस्त्रक्रिया झाल्यानंतर पशुला काही काळासाठी विश्रांती द्यावी लागते. याव्यतिरिक्त जास्त काळजी घ्यावी लागत नाही.
  • ही शस्त्रक्रिया खूप कमी वेळ व अल्प खर्चामध्ये होणारी आहे.
  • शस्त्रक्रिया केल्यानंतर जनावरावर कामासाठी कोणतेही बंधन राहत नाही.
  • - डॉ. शुभांगी वाघमारे,  ९६८९८४३५३६ (पशुवैद्यकीय शल्यचिकित्सा व क्ष किरण शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT