Goat Farming Scheme Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Husbandry : पशुपालनासाठी महिला शेतकरी सरसावल्या

Animal Husbandry Training : कर्जत पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभाग, सधन कुक्कुटपालन विकास गट आणि युनायटेड वे माध्यमातून महिला शेतकऱ्यांना पशुपालन प्रशिक्षण देण्यात आले.

Team Agrowon

Karjat News : कर्जत पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभाग, सधन कुक्कुटपालन विकास गट आणि युनायटेड वे माध्यमातून महिला शेतकऱ्यांना पशुपालन प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण शिबिरात तालुक्यातील ५० महिलांना पशुपालक म्हणून सहभाग घेता आला.

कर्जत पंचायत समिती येथे पशुसंवर्धन विभाग, सधन कुक्कुट विकास गट व युनायटेड वे या सेवाभावी संस्थेकडून कर्जत तालुक्यातील ५० महिलांसाठी पशुपालनाचे प्रशिक्षण ठेवण्यात आले होते. पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. गिरीश बारडकर यांनी शिबिराचा मुख्य उद्देश सांगतानाच पशुपालनाच्या गरजा आणि सद्यस्थितीवर मार्गदर्शन केले.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशुधन अभियानाबाबत माहिती देतानाच सर्व पशुपालकांनी सहभाग होण्याचे आवाहन केले. कर्जत तालुक्याचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजना / मनरेगा अंतर्गत दुधाळ जनावरांचे गोठे, शेळ्याचे गोठे/वाडे बांधकाम योजना आणि इतर योजनांबाबत मार्गदर्शन केले. कशेळे येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. शशिकांत थोरात यांनी किसान क्रेडिट कार्डबाबत मार्गदर्शन केले.

लम्पी स्कीन आजारावर मार्गदर्शन

दुधाळ गट, शेळी गट, कुक्कुट पक्षिगृह बांधकाम, एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम, वैरण विकास योजना या शासकीय योजनांबाबत पशुधन विकास अधिकारी डॉ. मिलिंद जाधव यांनी मार्गदर्शन केले.

लम्‍पीची लागण झाल्यास कशाप्रकारे काळजी घ्यायची. तसेच त्यावरील लसीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. याशिवाय, पशुपालकांनी गोठ्यात व जनावरांच्या अंगावर औषध फवारणी करावी, असे आवाहन जाधव यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT