Animal Care  Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : वाढत्या उन्हामुळे जनावरांना कोणते आजार होतात?

उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची टंचाई, पिण्याच्या पाण्याची टंचाई, वाढलेली उष्णता असे अनेक प्रश्न निर्माण होतात. अशा परिस्थितीत जनावरांना अनेक आजार होण्याची शक्यता असते.

Team Agrowon

उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची टंचाई (Fodder Defect), पिण्याच्या पाण्याची टंचाई, वाढलेली उष्णता  असे अनेक प्रश्न निर्माण होतात. अशा परिस्थितीत जनावरांना अनेक आजार (Animal Diseases) होण्याची शक्यता असते.

हे आजार झाल्यास काय उपाय करावेत? तसचं आजार होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी? याविषयी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहूया. 

नाकातील रक्तस्त्राव 

अति उष्णतेमुळे माणसांप्रमाणेच जनावरांना सुद्धा उन्हाळ्यात रक्तस्त्राव होतो. हा रक्तस्त्राव संकरित जनावरांमध्ये (Hybrid Animals) मोठ्या प्रमाणात दिसून येतो.  

उपाय म्हणून जनावराच्या डोक्यावर थंड पाणी ओतावं. भरपूर थंड पाणी पिण्यासाठी द्यावं. हिरवा चारा द्यावा. जनावरे झाडाखाली किंवा गोठ्यामध्ये सावलीत राहतील याची काळजी घ्यावी.

रक्तस्त्राव थांबत नसेल तर पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने जनावरांना जीवनसत्व क (Vitamin c) आहारातून किंवा औषधातून द्यावं. 

कडव्या आजार

हा आजार अधिक सूर्यप्रकाशामुळे जनावरांच्या कातडीला होतो. ज्या जनावरांच्या कातडीचा रंग पांढरा असतो त्या जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव जास्त दिसतो.

कारण पांढरा रंग असणाऱ्या जनावरांच्या कातडीत मेलेनीन नावाचा घटक कमी प्रमाणात असतो. चाऱ्याच्या कमतरतेमुळे भुकेपोटी जनावरे हे गाजर गवत खात असतात आणि अशी जनावरे सूर्यप्रकाशात अधिक वेळ राहिली असता हा आजार होतो.

या गवतातील विषारी घटक व सूर्यप्रकाशाचा परिणाम कातडीवर दिसून येतो. उपाय म्हणून जनावरांना सावलीत बांधावे. भरपूर प्रमाणात थंड पाणी द्यावं.पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली उपचार घ्यावेत. 

कॅल्शियमची कमतरता 

हिरव्या चाऱ्याआभावी बरेच पशुपालक जनावरांना उसाचे वाढे खाऊ घालतात. वाढे जास्त खाऊ घातल्यामुळे वाड्यातील ऑक्झलेट खनिज व जनावरांच्या शरीरातील कॅल्शियम एकत्र होऊन लघवी वाटे निघून जाते.

त्यामुळे जनावराच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी होते. त्यामुळे जनावरांना  मिल्क फिव्हर हा आजार होतो. यामुळे जनावर थकून एकदम खाली बसतात. शरीराचे तापमान कमी होते. रवंथ करणं बंद होतं. जनावरे खात नाहीत.

दूध देणं कमी होतं. शरीर थंड पडतं. जनावरे मान टाकून बसतात यावर तातडीने पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT