जनावरांना तज्ञ पशुवैद्यकांच्या सल्ल्यानेच लसीकरण करावे.
जनावरांना तज्ञ पशुवैद्यकांच्या सल्ल्यानेच लसीकरण करावे. Agrowon
काळजी पशुधनाची

जनावरांचे लसीकरण करताना कोणती काळजी घ्यावी !

Roshani Gole

पशुधनाचे (livestock) व्यवस्थापन करीत असताना बदलत्या ऋतुमानानुसार जसा बदल त्यांच्या आहारात करणे गरजेचे आहे. त्याचप्रकारे या बदलत्या वातावरणाशी सामना करण्यासाठी, त्यांचे वेळेत लसीकरण केले पाहिजे. कोणत्याही रोगाची (disease) बाधा झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक लसीकरण (vaccination) करणे, केव्हाही फायद्याचे ठरते.

वेळेत लसीकरण आणि जंतनिर्मुलन केल्याने जनावरांच्या आरोग्याचे सर्वच प्रश्न सुटतात. गोठ्यातील जनावरांचे लसीकरण केल्याने साथीच्या रोगांस अटकाव घालता येतो. कोणत्याही रोगाची साथ आल्यानंतर लसीकरण केल्यानंतर, त्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी कमीत कमी तीन आठवड्यांचा कालावधी लागतो.

लसीकरण करण्यापूर्वी घ्यायची काळजी-

- जनावरास एक आठवडा अगोदर जंतनाशक पाजून घ्यावे.

- जनावरांच्या बाहेरील परजीवीचा कीटकनाशके वापरून नयनाट करावा.

- बैलांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा ताण येऊ नये म्हणून, एक आठवडा आधी त्यांना हलके काम द्यावे.

- लस दिल्यानंतर मानेवर गाठ येऊ नये म्हणून, त्या जागेवर हलकेच चोळून घ्यावे, आलेल्या गाठीला कोमट पाण्याने शेकविल्यास गाठ विरून जाते.

लसीकरण करताना घ्यायची काळजी-

- लसीकरण तज्ञ पशुवैदकाच्या सल्ल्यानेच करावे.

- वापरली जाणारी लस चांगल्या नामांकित कंपनीची असावी.

- लस खरेदी करताना औषध कालबाह्य होण्याची तारीख तपासून पहावी.

- जनावरांना ठराविक मात्रेमधेच लस द्यावी.

- दिल्या जाणाऱ्या लसीचा बॅच क्रमांक नोंद ठेवावी.

- लस जनावरांना टोचेपर्यंत थंड व कोरड्या ठिकाणी ठेवावी.

- लसीकरण नेहमी निरोगी जनावरांचेच करावे.

- गाभण तसेच ६ महिन्याखालील वासरांना लस देऊ नये.

- लसीकरण शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावे.

- लसीकरणासाठी वापरली जाणारी सुई प्रत्येक वेळी बदलावी, किंवा निर्जंतुक करावी.

- उघड्यावरील लस जनावरांना टोचू नये.

- जनावरांमध्ये कोणताही रोग होण्याची वाट न बघता प्रतिबंधात्मक म्हणून लस टोचून घ्यावी.

- फोडलेली लस लवकरात लवकर संपवावी, लसीचा साठा करु नये.

दुग्ध व्यवसायात दुधाळ जनावरांना निरोगी ठेवणे आवश्यक असते. दुधाळ जनावरांना कोणत्याही प्रकारच्या रोगाची बाधा झाल्यास दूध उत्पादनात घट होते. जनावरांची कार्यक्षमता कमी होते, त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनाची प्रतही खालावते. लसीकरणामुळे जनावरांची रोग प्रतिकारक्षक्ती वाढते, मात्र हि रोगप्रतिकार क्षक्ती विशिष्ट कालवधीसाठी असते. त्यामुळे तज्ञ पशुवैद्काच्या सल्ल्यानेच लसीकरण करावे. जनावरांना नियमितपणे लसीकरण केल्यास संसर्गजन्य रोगाचे प्रमाण कमी होऊन जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

SCROLL FOR NEXT