Animal Care  Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : जनावरांवरील प्रथमोपचाराच्या सुविधा पूर्ण करा ः मित्तल

Veterinary : प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यात माणसाच्या सोयीप्रमाणेच जनावरांसाठी सोयीसुविधा आवश्यक आहेत. सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गरजेचे आहे.

Team Agrowon

Nashik News : प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यात माणसाच्या सोयीप्रमाणेच जनावरांसाठी सोयीसुविधा आवश्यक आहेत. सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गरजेचे आहे.

तसेच जनावरांच्या आजारांच्या व प्रथमोपचाराच्या आवश्यक सूचना पशुपालकांसाठी असाव्यात त्या दृष्टीने शासनाच्या माध्यमातून त्या पूर्ण कराव्यात, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी बुधवारी (ता. ५) नैताळे (ता. निफाड) येथील श्रेणी–१ च्या पशुवैद्यकीय दवाखान्यास भेट देऊन कामधेनू कायापालट या योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.

पशुवैद्यकीय दवाखान्याबाबत निफाड तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. पंकज कळसकर व डॉ. तोरण पवार यांनी सविस्तर माहिती दिली. मित्तल यांनी स्वतः पशुवैद्यकीय दवाखान्याची आतून पाहणी केली.

याप्रसंगी निफाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, सुनील पाटील, बांधकाम विभागाचे पुरी, रूपाली जाधव, मोतीराम भवर, वैद्यकीय अधिकारी पुरुषोत्तम चारुडे, ग्रामविकास अधिकारी उज्वला भोईर, रोशन बोरगुडे, गणपत सुरासे यांच्यासह पशुवैद्यकीय दवाखान्याचे कर्मचारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT