Lumpy Vaccination Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Vaccination : खानदेशात जनावरांचे लसीकरण एक लाखांवर

Lumpy Skin Disease : खानदेशात लम्पी स्कीन आजाराची समस्या गोवर्गीय पशुधनात वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात हा आजार पसरत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात लम्पी स्कीन आजाराची समस्या गोवर्गीय पशुधनात वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात हा आजार पसरत आहे. एक लाखांवर पशुधनाला मागील तीन दिवसात खानदेशात लसीकरण झाले आहे. लसीकरण सुरूच आहे.

जळगाव जिल्ह्यात सुरवातीला चाळीसगाव, पाचोरा, भडगाव या भागात हा आजार पशुधनात होता. नंतर धरणगाव, पारोळा,एरंडोल व अमळनेरात हा आजार पसरला. आता जळगाव, जामनेर, चोपडा भागातही हा आजार पसरला आहे. मागील वर्षी रावेर, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर, बोदवड या भागात या आजाराने पशुधनाची हानी झाली होती.

यंदा चाळीसगाव, पाचोरा, धरणगाव, पारोळा, अमळनेर, पाचोरा भागात पशुधनाची हानी अधिक होत आहे. मागील तीन दिवसात जळगाव जिल्ह्यात ११ पशुधन या आजारामुळे मृत्यूमुखी पडले आहे. धुळे व नंदुरबारातही लसीकरण सुरू आहे. पण मृत्यूदर वाढू लागला आहे. धुळे व नंदुरबारात सातपुडा पर्वत व लगत हा आजार दिसला आहे.

मागील आठवडाभरात सुमारे सात पशुधनाचा मृत्यू या दोन्ही जिल्ह्यांत झाला आहे. दुर्गम भागात यंत्रणा पोचत नसल्याने हा आजार टिकून राहीला. त्याने आता डोके वर काढले असून, दूध उत्पादक चिंतेत आहेत.

जळगाव जिल्ह्यात मागील महिनाभरात एकूण ९५ पशुधनाचा मृत्यू या आजाराने झाला आहे. पशुधनाचे नुकसान झालेल्या संबंधितांना भरपाई देण्यासंबंधीचे प्रस्ताव प्रशासन तालुकास्तरावर करीत आहे. मनुष्यबळ कमी असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

जळगाव जिल्ह्यात ९४ टक्क्यांवर लसीकरण झाले आहे. तसेच धुळे व नंदुरबारातही लसीकरण बऱ्यापैकी किंवा ८० टक्क्यांवर झाले आहे. परंतु आजार पसरत असतानाच लसीकरण सुरू केल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.

प्रतिबंधात्मक उपाय उन्हाळ्यात किंवा त्यापूर्वीच करायला हवे होते, असे दूध उत्पादकांचे म्हणणे आहे. लसीकरणासाठी धावपळ होत आहे. दुसरीकडे बेजार अवस्थेतील पशुधनावर उपचार करण्यासंबंधीदेखील प्रसासनाची कसरत सुरू आहे.

यात अनेक भागात शेतकऱ्यांना खासगी पशुवैद्यकांच्या मदतीने उपचार करून घ्यावे लागत आहेत. यात अधिकचा खर्च येत आहे. अनेक भागात शासकीय यंत्रणा पोचलेली नाही.

पशुधन पर्यवेक्षक पैसे घेत असल्याच्या तक्रारीदेखील दूध उत्पादक करीत आहेत. प्रस्ताव तातडीने तयार करून त्यांची मंजुरी मिळवावी व दूध उत्पादकांना नुकसानीसंबंधी भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

या भागात लम्पी प्रादुर्भाव..

धुळे, नंदुरबारात सातपुडा पर्वत, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, धरणगाव, पारोळा,एरंडोल व अमळनेरात, जळगाव, जामनेर, चोपडा या भागात लम्पी आजाराने बाधीत पशुधन आढळून आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT