Lumpy Vaccination Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Vaccination : सोलापुरात १३ गावांत लसीकरणाला वेग

जिल्ह्यातील लागण झालेल्या शिंगोर्णी, मांडवे आणि नंदूर या तीन गावांच्या परिसरातील पाच किलोमीटर परिसरातील जवळपास १३ गावांतील जनावरांचे लसीकरण सुरू केले आहे. त्यातून आतापर्यंत ८ हजार ६२५ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः लम्पी स्कीनच्या (Lumpy Skin) प्रादुर्भावाची व्याप्ती जिल्ह्यात वाढत असताना, पशुसंवर्धन विभागाने (Department Of Animal Husbandry) लसीकरणही (Animal Vaccination) वेगाने वाढवत नेले आहे. जिल्ह्यातील लागण झालेल्या शिंगोर्णी, मांडवे आणि नंदूर या तीन गावांच्या परिसरातील पाच किलोमीटर परिसरातील जवळपास १३ गावांतील जनावरांचे लसीकरण (Lumpy Vaccination) सुरू केले आहे.

तसेच उपचारही तातडीने सुरू करण्यात आले. जवळपास दहा जनावरांपैकी सहा जनावरे सध्या बरी झाली आहेत. त्यानंतरही नंदूर (ता. उत्तर सोलापूर), मिसाळवाडी, महूद (ता. सांगोला) या भागातील काही जनावरांमध्ये ही लक्षणे आढळल्याने इथल्या लक्षणग्रस्त जनावरांच्या आजाराचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यामुळे या आजाराची व्याप्ती लक्षात घेत या गावाच्या परिसरातील १३ गावांत आता लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यापैकी ८ हजार ६२५ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित जनावरांचे लसीकरणही लवकरच पूर्ण होईल.

त्यातून आतापर्यंत ८ हजार ६२५ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. या आधी शिंगोर्णी, मांडवे (ता. माळशिरस) येथे जनावरांमध्ये लम्पी स्कीनची लक्षणे आढळल्यानंतर या ठिकाणी जनावरांच्या विलगीकरणासह लसीकरण सुरू करण्यात आले होते.

लसमात्रा शिल्लक

सोलापूर जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाकडे एकूण २६ हजार ५०० लसमात्रा उपलब्ध होत्या. त्यापैकी आतापर्यंत ८ हजार ६२५ मात्रा वापरण्यात आल्या आहेत. आणखी लसीकरण सुरूच आहे. पण सध्या १७ हजार ८७५ लसमात्रा जिल्ह्याकडे शिल्लक आहेत. त्यामुळे शेतकऱ्य़ांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरणही पशुसंवर्धन विभागाने दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT