Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : जनावरांच्या नाकातील रक्तस्त्राव, कडव्या आजाराचे नियंत्रण

Animal Diseases : उन्हाळ्यात पशुपालकांना हिरव्या चाऱ्याची टंचाई,पिण्याच्या पाण्याची कमतरता तसच वाढलेली उष्णता अशा अनेक समस्यांना सामोर जावं लागतं. अशा परिस्थितीत जनावरांना अनेक आजार होण्याची शक्यता असते.

Team Agrowon

Animal Summer Care : उन्हाळ्यात पशुपालकांना हिरव्या चाऱ्याची टंचाई,पिण्याच्या पाण्याची कमतरता तसच वाढलेली उष्णता  अशा अनेक समस्यांना सामोर जावं लागतं. अशा परिस्थितीत जनावरांना अनेक आजार होण्याची शक्यता असते.

अति उष्णतेमुळे माणसांप्रमाणेच जनावरांच्या नाकातून सुद्धा रक्त येतं. नाकातील हा रक्तस्त्राव संकरित जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. यावर उपाय म्हणून जनावराच्या डोक्यावर थंड पाणी ओतावं. 

जनावरांना भरपूर थंड पाणी आणि हिरवा चारा द्यावा.जनावरे झाडाखाली किंवा गोठ्यामध्ये सावलीत राहतील याची काळजी घ्यावी. रक्तस्त्राव थांबत नसेल तर पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने जनावरांना जीवनसत्व क आहारातून किंवा औषधातून द्यावं. 

जास्त  उन्हामुळे जनावरांच्या कातडीला कडव्या आजार होतो.ज्या जनावरांच्या कातडीचा रंग पांढरा असतो त्या जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव जास्त दिसतो.कारण पांढरा रंग असणाऱ्या जनावरांच्या कातडीत मेलेनीन नावाचा घटक कमी प्रमाणात असतो.

चाऱ्याच्या कमतरतेमुळे भुकेपोटी जनावर गाजर गवत खातात आणि अशी जनावरे सूर्यप्रकाशात अधिक वेळ राहिली असता जनावरांना कडव्या  हा आजार होतो. गाजर गवतातील विषारी घटक आणि कडक उन्हाचा परिणाम कातडीवर दिसून येतो.यावर उपाय म्हणून जनावरांना सावलीत बांधावं. जनावरे गाजर गवत खाणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्याना भरपूर प्रमाणात थंड पाणी द्यावं.याशिवाय पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली उपचार घ्यावेत. 

हिरव्या चाऱ्याआभावी बरेच पशुपालक जनावरांना उसाचे वाढे खाऊ घालतात.वाढे जास्त खाऊ घातल्यामुळे वाड्यातील ऑक्झलेट खनिज आणि जनावरांच्या शरीरातील कॅल्शियम एकत्र होऊन लघवी वाटे निघून जातं. त्यामुळे जनावराच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी होते. त्यामुळे जनावरांना  मिल्क फिव्हर हा आजार होतो. यामुळे जनावर थकून एकदम खाली बसतात. शरीराचे तापमान कमी होते. रवंथ करणं बंद होतं. जनावरे खात नाहीत. दूध देणं कमी होतं. शरीर थंड पडतं. जनावरे मान टाकून बसतात यावर तातडीने पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत. अशा प्रकारे काळजी घेतल्यास जनावरे निरोगी आणि उन्हातही सुखरूप राहतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Surya Ghar Yojana: सौरऊर्जेतून घरगुती, कृषीला शाश्‍वत वीजपुरवठा

Solar Agriculture Pump: सौरपंपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी रखडपट्टीच

Crop Loan: कर्ज पुनर्गठनाची अंमलबजावणी रखडली

Tomato Late Blight: टोमॅटो पिकावरील उशिराने येणारा करपा नियंत्रणाचे सोपे उपाय

Nanded Degloor Expressway: नांदेड–देगलूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला मिळणार गती

SCROLL FOR NEXT