Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : नांदेड जिल्ह्यात आत्तापर्यंत १७ जनावरे मृत्यूमुखी

जिल्ह्यातील १९१ जनावरांना ‘लम्पी स्कीन’ची बाधा झाली आहे. तर आज पर्यंत १७ जनावरांचा लम्पी आजारामुळे मृत्यू झाला आहे.

टीम ॲग्रोवन

नांदेड : जिल्ह्यातील १९१ जनावरांना ‘लम्पी स्कीन’ची (Lumpy Skin Disease) बाधा झाली आहे. तर आज पर्यंत १७ जनावरांचा लम्पी आजारामुळे मृत्यू झाला आहे. लम्पीच्या नियंत्रणासाठी तीन लाख ६३ हजार ४६६ जनावरांचे लसीकरण (Lumpy Vaccination) पूर्ण झाले आहे.

नऊ पशुपालकांना शासनाच्या निकषानुसार अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. इतर प्रकरणाच्या प्रस्तावाची निकषानुसार प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मधुसूदन रत्नपारखी यांनी दिली.

जिल्ह्यात लम्पीमुळे बाधित जनावरांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. या रोगामुळे जनावरांच्या बाजारावर परिणाम झाला आहे. बाधित जनावरांचे मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने पशुपालकांना चिंता लागली आहे. आजच्या घडीला नांदेड जिल्ह्यातील ४६ गावे लम्पी बाधित आहेत.

या ४६ गावातील २२ हजार ७६८ जनावरांची सख्या आहे. यातील १९१ बाधित जनावरांना वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या पाच किमी परिघातील गावांची संख्या २८६ आहे. एकूण बाधित गावे ३३२ झाली आहेत.

या बाधित ४६ गावांच्या पाच किलोमीटर परिघातील ३३२ गावात ९४ हजार ४७६ जनावरे आहेत. लम्पीमुळे आजपर्यंत १७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशूची स्वच्छता, गोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सात जिल्ह्यात शंभर जनावरांचा मृत्यू

मराठवाड्यातील आठ पैकी सात जिल्ह्यात लम्पी आजाराने जनावरांना आपल्या विळख्यात घेतले आहे. रविवार (ता. २) पर्यंत या सातही जिल्ह्यात जवळपास १०३ जनावरांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये सर्वाधिक मृत्यू झालेल्या जनावरांची संख्या औरंगाबाद जिल्ह्यात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT