Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Disease : लम्पी स्किन आजारानं पुन्हा डोक वर काढलं ; तीन जनावरे दगावली

Animal Health Care : गेल्या काही महिन्यांमध्ये काहीसा कमी झालेला लम्पी स्किनचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. राज्यातील विविध भागात पुन्हा एकदा  जनावरांना लम्पीची लागण झाल्याचे समोर येत आहे.

Team Agrowon

Lumpy Skin Disease News : गेल्या काही महिन्यांमध्ये काहीसा कमी झालेला लम्पी स्किनचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. राज्यातील विविध भागात पुन्हा एकदा  जनावरांना लम्पीची लागण झाल्याचे समोर येत आहे.

गोंदिया जिल्ह्यातही लम्पीने पुन्हा डोक वर काढले असून एकाच महिन्यात यामुळे तीन जनावरे दगावली आहेत. जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पशुपालक मात्र चिंतेत सापडले आहेत.

लम्पी स्किन हा जनावरांमध्ये आढळून येणारा त्वचेचा आजार आहे. या आजारामध्ये जनावरांच्या सर्वांगावर गाठी येतात. आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांची भूक मंदावते. परिणामी जनावर अशक्त होते. तसेच जनावराला तापही येतो.

राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांच्या लसीकरणाची मोहिमही हाती घेण्यात आली होती. लसीकरणामुळे काही काळासाठी लम्पी आजार आटोक्यात आला आहे, असे वाटत असतानाच आता राज्यातील वेगवेगळ्या भागांत जनांवरांमध्ये पुन्हा एकदा लम्पीची लागण झाल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यातील चिखली येथील लम्पी स्किन आजारामुळे तीन जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. खरीप हंगाम अगदी तोंडावर आला आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांची खरीपातील शेतीच्या कामांची लगबग सुरू आहे. त्यातच आता पुन्हा लम्पीचा प्रसार सुरू झाल्याने पशुपालक मात्र चिंतेत आहेत.

दरम्यान, गोवंश जातीच्या जनांवरांमध्ये आढळणारा लम्पी स्किन हा त्वचेचा आजार योग्य उपचारानंतर बरा होतो. मात्र, जनावरांना योग्यवेळी उपचार मिळाले नाही, तर जनावर दगावण्याची शक्यता असते.

या आजारामुळे पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प असले तरी, आजाराची लक्षणे आढळल्यास पशुपालकांनी त्वरित उपचार करणे गरजेच आहे. अधिक माहितीसाठी पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००-२३३०-४१८ किंवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेसाठीच्या १९६२ या टोल फ्री क्रमांकावर तत्काळ संपर्क साधावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amravati Water Crisis : अमरावती जिल्ह्यातील पाच तालुक्यांत भूजलाची चिंता

Seva Sankalp Abhiyan : बीड जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश

Krishna River : ‘कृष्णे’वरील उपसाबंदी उठली; दुष्काळी भागास कधी दिलासा?

Watermelon Farming : कलिंगडास प्रतिकूल वातावरणाचा फटका

Woman Farmer Certificate : महिलांना घरी मिळणार ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’

SCROLL FOR NEXT