Livestock Market Agrowon
काळजी पशुधनाची

Livestock Sale : घरगुती स्वरूपात जनावरे विक्री व्यवहार त्रासदायक

लम्पी स्कीनमुळे पशुधनाच्या खरेदी-विक्रीला ‘ब्रेक’ लागला आहे. जनावरांच्या बाजारावर निर्बंध असल्याने जनावरांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

टीम ॲग्रोवन

कोवाड, जि. कोल्हापूर ः लम्पी स्कीनमुळे (Lumpy Skin) पशुधनाच्या खरेदी-विक्रीला (Livestock Market) ‘ब्रेक’ लागला आहे. जनावरांच्या बाजारावर निर्बंध असल्याने जनावरांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. यामुळे जनावरांच्या खरेदी-विक्रीचे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे आहे. घरगुती स्वरूपात जनावरे खरेदी करणे व विक्री करण्याचा मार्ग शेतकऱ्यांनी शोधला असला तरी तो तितकाच त्रासदायक व महागडा ठरत आहे.

तीन ते चार महिन्यांपासून जनावरांना लम्पी स्कीन या त्वचा आजाराने ग्रासले. गावोगावी जनावरांना या आजाराची लागण झाल्याचे चित्र आहे. यामुळे पशुपालकांत भीती निर्माण झाली. चंदगड तालुक्यात तुर्केवाडी व अडकूर हे जनावरांचे दोन मोठे बाजार आहेत. यातून जनावरांच्या खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार होतात.

सीमाभागात दड्डी येथेही जनावरांचा मोठा बाजार भरतो. यासह अनेक छोटे-मोठे बाजार आहेत. फार मोठ्या प्रमाणात या बाजारांतून जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असतात. कर्नाटकासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणची जनावरे या बाजारांतून आणली जातात. लम्पी स्कीनमुळे सध्या या बाजारांवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे पशुधनाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा शेतकऱ्यांना फटका बसतो.

चंदगड तालुक्यात नोव्हेंबरपर्यंत लम्पी स्कीनमुळे ९२ जनावरे बधित झाली होती. त्यामुळे जनावरांचे सर्व बाजार बंद ठेवले आहेत. त्याचबरोबर जनावरांची ने-आण करण्यावरही बंदी घातली. त्यामुळे जनावरांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प आहेत. याचा शेती व दूध व्यवस्थेवर परिणाम झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT