Goat Farming : Agrowon
काळजी पशुधनाची

Goat Farming : शेळीपालनाची अर्धबंदिस्त पद्धत किती फायद्याची?

Goat Rearing : शेळीपालनासाठी आपल्याकडील उपलब्ध गोष्टी व त्यानुसार गोठ्याची रचना व पद्धतीचा अवलंब करावा. शेळीपालन व्यवसाय पूर्ण बंदिस्त पद्धत, अर्ध बंदिस्त पद्धत आणि परंपराग चराऊ पद्धत अशा तीन पद्धतींनी केला जातो.

Team Agrowon

Goat Management : शेळीपालन व्यवसाय वेगवेगळ्या पद्धतींनी करता येतो. प्रत्येक पद्धतीमध्ये वेगवेगळ्या सोयीस्कर गोष्टी व अडचणी असतात. शेळीपालनासाठी आपल्याकडील उपलब्ध गोष्टी व त्यानुसार गोठ्याची रचना व पद्धतीचा अवलंब करावा. शेळीपालन व्यवसाय पूर्ण बंदिस्त पद्धत, अर्ध बंदिस्त पद्धत आणि परंपराग चराऊ पद्धत अशा तीन पद्धतींनी केला जातो.

यापैकी अर्ध बंदिस्त पद्धती मध्ये शेळ्यांना पूर्ण वेळ गोठ्यामध्ये ठेवले जात नाही. दिवसातून ३-४ तासांसाठी गोठ्यातून बाहेर चरायला नेले जाते आणि राहिलेल्या वेळेत चारा जागेवरच दिला जातो.

अर्ध बंदिस्त शेळीपालनाचे फायदे

अर्ध बंदिस्त पद्धती शेळीपालन पद्धतीमध्ये खाद्यावरील खर्च काही प्रमाणात कमी करता येतो

शेळ्यांना ठराविक वेळेत व जागेत चारल्यामुळे शेळ्यांना चांगला व्यायाम मिळतो.

गोठ्यातील एकूणच खर्चावर नियंत्रण ठेवता येते.

शेळ्यांची संख्या कमी असल्यास चांगला उपयोग होतो.

व्यवस्थापन व्यवस्थित असल्यास रोगराई व अनावश्‍यक पैदास टाळता येऊ शकते.

चरण्यासाठी कुरणाची व्यवस्था करावी लागते.

शेळ्यांच्या कुरणाभोवती कुंपण करण्यावर खर्च येऊ शकतो.

व्यवस्थापनावर लक्ष नसल्यास शेळ्यांना रोगांचा संसर्ग होऊ शकतो. वजनात चांगली वाढ मिळत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT