Summer management of animals Agrowon
काळजी पशुधनाची

उन्हाळ्यात जनावरांची घ्या विशेष काळजी

उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची कमतरता आणि उष्णतेचा त्रास जास्त होत असतो. याचा परिणाम जनावरांच्या दूध उत्पादनावर, प्रजनन क्षमतेवर होतो.

Team Agrowon

उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची कमतरता (fodder scarcity)आणि उष्णतेचा त्रास जास्त होत असतो. याचा परिणाम जनावरांच्या दूध उत्पादनावर (milk production) , प्रजननक्षमतेवर (reproduction) झालेला दिसून येतो. वाढत्या तापमानामुळे शरीराचे तापमान वाढते, चारा खाण्याचे प्रमाण कमी होऊन, पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. दूध उत्पादनात घट दिसून येते. वाढत्या उष्णतेमुळे जनावरे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढत जाते.

जनावरांची प्रजननक्रिया इतर सर्व शरीरक्रियांवर अवलंबून असते. उन्हाळ्यात जगण्यासाठी आवश्यक त्याच शरीरक्रियांचाच जनावरांना ताण असतो. त्यामुळे प्रजननाची क्रिया मंदावते. परिणामी या काळात जनावरे माजावर येण्याचे प्रमाण कमी होते. शरीर क्रिया सुरळीत चालू ठेवण्यासाठी अतिरिक्त ऊर्जायुक्त आहार दिल्यास शरीर वाढीसाठी व दूध उत्पादन वाढीसाठी गरजेचा असतो.

उन्हाळ्यात गाभण जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण जन्माला येणाऱ्या वासराची प्रजननक्षमता ही त्याची गर्भाशयातील पोषणावर अवलंबून असते. संकरित आणि विदेशी जनावरांवर उन्हाळ्यातील अति उष्णतेचा जास्त परिणाम दिसून येतो. यामुळे जनावरे चरायला नेताना सकाळी व दुपारी उशिरा न्यावीत.

उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याच्या टंचाईमुळे, जनावरांच्या खाद्यामध्ये आकस्मिक बदल होत असतो. कारण उन्हाळ्यात जनावरांना मिळेल ते खाद्य देऊन त्यांची गरज भागविली जाते. जनावरांनी रवंथ न केल्यास त्यांना अपचनासारखे आजार होत असतात. चारा खाण्याचे प्रमाण कमी होऊन, दूध उत्पादनात घट दिसून येते.

जनावरांना दिवसभरात लागणारा चारा एकाचवेळी न देता, विभागणी करून तीन ते चार वेळा द्यावा. चाऱ्याची नासाडी टाळण्यासाठी त्याची बारीक कुट्टी करावी. चारा तसाच टाकला तर वाया जातो, कुट्टी करून दिल्यास वाया जाण्याचे प्रमाण कमी होते. उपलब्ध असल्यास हिरवा व वाळलेला चारा यांचे मिश्रण करावे. वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी शिंपडावे म्हणजे जनावरे आवडीने चारा खातात. चाऱ्याची कमतरता असल्यास खाद्यामध्ये हरभरा, भुईमुगाची टरफले, गव्हाचा भुस्सा, उसाचे वाढे यांचा गरजेनुसार वापर करावा. दिवसातून एक ते दोन वेळा पाणी पाजण्याऐवजी चार ते पाच वेळा पाणी पाजावे.

अपुरा चारा व निकृष्ट आहारामुळे जनावरे अशक्त बनून त्यांची प्रतिकारशक्ती कमी होत असते. त्यामुळे पशुतज्ज्ञांकडून वेळीच जनावरांना लाळ्या-खुरकूत, घटसर्प, फऱ्या रोगाविरुद्ध लस टोचावी. परोपजीवी जंतूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जंतुनाशक औषधे पाजावीत. गाभण आणि दुधाळ जनावरांची विशेष काळजी घ्यावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

Election Results Maharashtra 2024 : महाराष्ट्रावर महायुतीचेच राज्य

Pune Assembly Election Result : पुणे जिल्ह्यात महायुतीच !

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

SCROLL FOR NEXT