Cow Market Agrowon
काळजी पशुधनाची

Cow Market : आळेफाट्याच्या बाजारात १६५ गायींची विक्री

Livestock Market : आळेफाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २) झालेल्या बाजारात १६५ गायींची विक्री होऊन ४० लाखांची झाली उलाढाल झाली.

Team Agrowon

Pune News : आळेफाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २) झालेल्या बाजारात १६५ गायींची विक्री होऊन ४० लाखांची झाली उलाढाल झाली.

येथील बाजार समितीत दर गुरुवारी भरत असलेला गायींचा बाजार पुणे जिल्ह्यात सर्वात मोठा गायींचा बाजार म्हणून प्रसिद्ध असून, येथील बाजारात पारनेर, अकोले, पुणे, नाशिक, संगमनेर, ठाणे, अहमदनगर, अकोले, राजगुरुनगर, संभाजीनगर, तसेच इतर ठिकाणाहून संकरित दुधाळ जातीच्या गाया खरेदी-विक्रीसाठी येत असतात.

या आठवड्यातील बाजारात १७९ संकरित गाया विक्रीसाठी आल्या होत्या. यात १६५ गायींची विक्री होऊन १० हजारांपासून ६५ हजार रुपयापर्यंत विक्री झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती प्रकाश ताजणे, संचालक धोंडिभाऊ पिंगट, सचिव रूपेश कवडे, कार्यालय प्रमुख प्रशांत महाबरे यांनी दिली.

दरम्यान, ऐन उन्हाळ्यात दुधाचे बाजार भाव उतरल्याने याचा फटका आळेफाटा येथी गाय बाजाराला बसला असून, जिरायती भागातील शेतकऱ्यांकडून गायींच्या खरेदी-विक्रीस अल्प प्रतिसाद मिळाला.

तर गायींच्या किंमतही उतरल्या आहेत, अशी माहिती रूपेश कुऱ्हाडे प्रशांत कुऱ्हाडे,संतोष कुऱ्हाडे, अमोल कुऱ्हाडे, दिलीप सरमाळे, विजय थोरात, अमोल मोडवे, सिकंदर शेख, नन्नु शेख, रोहिदास निमसे, जब्बार शेख, जब्बार पठाण या व्यापाऱ्यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT