Animal Care  Agrowon
काळजी पशुधनाची

Livestock Census : नेटवर्क अडथळ्यांमुळे दुर्गम भागांत पशुगणनेचा वेग मंदावला

Animal Care : दर पाच वर्षांनी होणारी पशुगणना नोव्हेंबरपासून सुरू झाली. यंदाची २१ वी पशुगणना पहिल्यादांच मोबाईल ॲपद्वारे होत असली तरी दुर्गम भागात नेटवर्कच्या अडथळ्यामुळे पशुगणना करण्यास मर्यादा येत आहे.

Team Agrowon

Satara News : दर पाच वर्षांनी होणारी पशुगणना नोव्हेंबरपासून सुरू झाली. यंदाची २१ वी पशुगणना पहिल्यादांच मोबाईल ॲपद्वारे होत असली तरी दुर्गम भागात नेटवर्कच्या अडथळ्यामुळे पशुगणना करण्यास मर्यादा येत आहे. दुर्गम भागात कागदोपत्री व ॲपवर नोंदणी करावी लागत असल्याने एकच काम दोनदा करण्याची वेळ कर्मचाऱ्यावर येत आहे.

केंद्र सरकारकडून दर पाच वर्षांत देशातील पशूंची गणना केली जाते. २०१९ मध्ये पशुगणनेत तीन कोटी जनावरांची नोंद झाली होती. सध्या सुरू झालेल्या पशुगणनेसाठी पहिल्यांदाच मोबाईल ॲपचा वापर केला जाणार असून १६ प्रकारच्या जनावरांची गणना केली जाणार आहे.

यामध्ये गोवंश आणि म्हैसवर्गीय सर्व जनावरे, रस्त्यावर फिरणारी कुत्रे व मांजरे, सर्व गोशाळांपर्यंत जाऊन गोशाळांचे सर्वेक्षण यांसह रस्त्यावर भटकंती करणाऱ्या पशूंचाही समावेश गणनेत होणार आहे.

प्रगणकामध्ये जनावराचे ब्रीड, लिंग व वय याची नोंद केली जात आहे. यामध्ये मोबाइल ॲपच्या माध्यमातून जणगणना सुरू आहे. दुर्गम भाग वगळता इतर ठिकाणी पशुगणना सुरळीत सुरू आहे. दुर्गम भागात नोंद करण्यासाठी प्रगणकांना अडचणी येत आहे.

यंदा सुरू झालेल्या पशुगणनेत भटक्या पशुपालकांच्या पशुगणनेसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. या पशुगणनतील डाटा थेट केंद्राच्या पशुसंवर्धन विभागाच्या पोर्टलवर नोंद होणार आहे. पशुगणनेसाठी जे प्रगणक शेतकऱ्यांच्या घरी जातील त्यांना पशूंची अचूक माहिती द्यावी.
- डॉ. विनोद पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT