Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : मोकाट जनावरांच्या गळ्यात रेडियमचे पट्टे

Stray Cow : पालघर जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांमुळे अपघातांची संख्या वाढत आहे.

Team Agrowon

Manor News : पालघर जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांमुळे अपघातांची संख्या वाढत आहे. हे अपघात रोखण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मोकाट जनावरांच्या गळ्यात रेडियमचे पट्टे बांधण्याची मोहीम राबवण्यात आली आहे.

त्याची सुरुवात गुरुवारी सकाळपासून करण्यात आली. उपक्रमादरम्यान १२००पेक्षा अधिक जनावरांच्या गळ्यात हे पट्टे बांधले आहेत.

पट्ट्यांमुळे वाहनांच्या हेड लाइटचा प्रकाश परावर्तीत होऊन रात्रीच्या वेळी होणारे अपघात रोखण्यास मदत होणार असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आली.

जिल्ह्यात मोकाट जनावरे मोठ्या संख्येने आहेत. रात्री रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांना वाहने धडकून होणाऱ्या अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.

जनावरांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी वाहतूक शाखेला दिल्या होत्या. या सूचनेनुसार वाहतूक शाखेचे प्रभारी सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवण्यात आली.

मनोर, पालघर, बोईसर, वाणगाव, सफाळे, मनोर, तारापूर, तलासरी, डहाणू, वाडा, कासा आणि मोखाडा येथे वाहतूक शाखेत कार्यरत ६० अंमलदारांनी मोहीम राबवली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : मक्याचे भाव दबावातच; कापूस, सोयाबीन, मका तसेच काय आहेत आजचे केळी दर?

Maharashtra Election 2024 : अकोट, जळगाव जामोदमध्ये शेतकरी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Sugar Factory Crushing Season : यंदाचा गळीत हंगाम २५ नोव्हेंबरपर्यंत लटकला; राज्य सरकारचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र

MSP Procurement Center : हमीभाव केंद्र सुरू न झाल्याने सोयाबीन उत्पादकांची अडचण

Sangli Congress : शेतकऱ्यांची नाही अदानी, अंबानींची कर्जमाफी करणार सरकार : खासदार इम्रान प्रतापगढी

SCROLL FOR NEXT